Ticker

6/recent/ticker-posts

जयाजी महाराज संस्थानच्या वतीने चातुर्मास समाप्ती व सत्कार सोहळा संपन्न

जयाजी महाराज संस्थानच्या वतीने चातुर्मास समाप्ती व सत्कार सोहळा संपन्न


सालाबाद प्रमाणे जयाजी महाराज संस्थेमध्ये आषाढ शुद्ध देवशयनी एकादशी ते कार्तिक शुद्ध प्रबोधनी एकादशी पर्यंत चातुर्मास मध्ये अखंड टाळ व मृदुंगांचा नाद चालत राहतो याची समाप्ती दिनांक 13/ 11 /2024 ला संपन्न झाली. ग्रंथ वाचनाची सेवा देणारे बाळू महाराज मेटांगे, यजमान रामदास धांडे व अखंड टाळ वाजवणारे सेवाधारी संतोष गवई, अवधूत वसु ,दिनकर वसु, गजानन भोजे, प्रकाश गणोरकर, दामोदर येवले, अर्जुन राठोड, गोपाळ डाबेराव ,भीमराव तायडे, भाऊराव भाऊ ,किशोर गावंडे, उत्तमराव राऊत ,अशोक तीरकर रेखा तीरकर ,पंचफुलाबाई खंडारे, सुमन गावंडे ,नीलिमा बुधेकर, सरला वसु ,शोभा मालवे यांनी अखंड सेवा दिल्या निमित्त यांचा साडीचोळी व कपडे देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मंदिराच्या विकासामध्ये सहकार्य करणारे अनिल जोशी सहाय्यक पोलीस निरीक्षक, नंदकिशोर सुळे पोलीस निरीक्षक बबनराव थोरात पोलीस निरीक्षक यांचा सुद्धा याप्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळेस व्यवस्थापक आनंदराव गणोरकर , सदस्य संजय राऊत संजय फडनाईक, शंकराव अंबाडकर ,प्रविण धामणे, बबनराव भालेराव, सुदामजी तायडे, केशवराव देशमुख, माधवराव सोळंके ,प्रविण ढगे, उपस्थित होते. ग्रंथ पूजनानंतर संध्याकाळी मोतीराम बाबाचे शिष्य अनिलभाऊ वाघमारे यांचा सत्संग झाला. यावेळेस सर्व गावकऱ्यांनी महाप्रसादाचा सुद्धा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अनिल ढगे, अशोक कह्रे, ओंकार गवळी, विनोद राजगुरे, व इतरही सर्व भक्तांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या