Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी अकोल्यात

आंतरराष्ट्रीय नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी अकोल्यात



अकोला :भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले कवाडे, महायुतीचे उमेदवार पश्चिम विदर्भातील यांच्या प्रचारार्थ राजेश्वर नगरीमध्ये  वऱ्हाड सर्वस्पर्शी विजय विकास संकल्प रॅलीला संबोधित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नेते देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 नोव्हेंबर रोजी स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानात मार्गदर्शन करण्यासाठी येणार असून अकोला अमरावती बुलढाणा यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या मताचा जोगावा मागण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे राजराजेश्वर नगरीमध्ये येत असून यासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात येत असून ही सभा भव्यदिव्य होण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून यासाठी वेगवेगळ्या 227 समित्या गठित करण्यात आल्या असून वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.


या दृष्टीने महायुतीचे संयुक्त कार्यकर्ते पदाधिकारी खासदार अनुप धोत्रे, खासदार अनिल बोंडे, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर प्रदेश उपाध्यक्षआमदार डॉ संजय कुटे, चैनसुख संचेती,खोडके आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया महाराष्ट्राचे मंत्री संजय राठोड आमदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात तसेच जिल्हाध्यक्ष महायुतीचे यांच्या नेतृत्वात व विविध सेलचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वात समित्या गठीत करण्यात आल्या. ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या