Ticker

6/recent/ticker-posts

विधानसभा निवडणुकीतील पराभवाने विजय अग्रवाल यांचे बेताल वक्तव्य

विधानसभा निवडणुकीतील पराभवाने विजय अग्रवाल यांचे बेताल वक्तव्य 


काँग्रेस महानगरअध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांचा टोला 




अकोला : साजीद खान पठान हे जनतेने निर्वाचित केलेले लोकप्रतिनिधि आहेत, त्यांच्या अकोला पश्चिम विधान् सभा क्षेत्रात कोणत्याही भागात सुरु असलेल्या कामाचे निरीक्षण करण्याचा, त्या कामात काही गैर प्रकार होत असतील तर ते सांगण्याचा त्यांना अधिकार आहे. डाबकी रोडच्या निर्माणासाठी मी निधी आणला असे कधीच साजीद खान यांनी म्हटलेले नाही आणी रोडचे भूमिपूजन करणार असे ही म्हटले नाही. विजय अग्रवाल हे उगाच ऊहापोह करीत असून पोकळ प्रसिद्धीसाठी दुधखुळे स्टेटमेंट देत आहे. त्यांच्या बोलण्याने काही फरक पडत नसून जनता सुजान आहे असा टोला काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी लगावला. 



बुधवारी साजिद खान पठाण हे डाबकी रोडच्या रुंदीकरणाची सध्या सुरु असलेल्या कामा संदर्भात पाहणी करण्यासाठी गेले होते. त्या भागातील नागरिकांनी काम सुरू झाल्यापासून काही तक्रारी आ. साजीद खान यांचे कडे केल्या आहेत. त्याची दखल घेऊन आ. साजीद खान डाबकी रोडच्या कामाचे निरीक्षण करण्यासाठी गेले यात काहीच चुकीचे नाही. परंतु साजीद खान यांना त्यांच्या कार्यशैलीमुळे मिळत असलेली लोकप्रियता आणि जनतेचा प्रतिसाद पाहता भाजपाचे विजय अग्रवाल फार धास्तावलेले आहेत. त्यांना आ. पठाण यांचा झालेला विजय खूपत आहे म्हणून ते आ. पठाणने कोणतेही काम केले की त्यांना मोठी पोट दुखी होत असल्याचे दिसून येत आहे. तर ते पराभूत मानसिकतेतून ,निराशेपोटी आ. साजिद पठाण यांच्यावर विविध आरोप करीत आपणच कार्यसम्राट आहे असे भासविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु जनता समजदार आहे. भारतीय जनता पक्षाच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींनी कितीही आरोप केले तरी आ. पठाण हे जनतेचे सेवक आहे, ते त्यांचे कार्य निरंतर चालू ठेवतील. त्यामुळे विजय अग्रवाल यांच्या ओरडण्याने काही फरक पडणार नाही. आ. पठाण यांना जनतेने पाच वर्षासाठी आमदार म्हणून निवडून दिलेले आहे , केवळ वैयक्तिक द्वेषा पोटी विजय अग्रवाल हे सर्व करित असून पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील मतदार सुज्ञ आहेत, असा टोला काँग्रेसचे महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक एम.पी.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या