विवरा परिसरातील सोलर प्लांटजवळ आढळला मृतदेह
प्रतिनिधी गुलाब भाऊ अंभोरे
चान्नी पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या विवरा-चरणगाव रस्त्यालगत असलेल्या सोलर प्लांटजवळ एका इसमाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. १० जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृतक इसमाचे नाव रमेश निंबोकार वय अंदाजे ३५ असे असून, तो दुपारी कामानिमित्त घरातून बाहेर गेला होता. मात्र संध्याकाळी सोलर प्लांटजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्ती हा अपंग असून तो मजुरीचे काम करीत होता. मृत व्यक्तीला अज्ञात २ - ३ व्यक्तीने जिवे मारले अशी प्राथमिक चर्चा आहे. त्याच्या सोबत वाद करून त्याला जिवे मारून त्याच्या कडील पैसे घेऊन निघून गेला अशी ग्रामस्थामधे चर्चा होती. यावेळी मृतकाने मारता वेळी त्याने त्याच्या बाभुळगाव भावाला फोनवरून सांगितले की मला हे असे असे लोक मारीत आहेत, चान्नी पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांना हि माहिती मिळताच पोलिस यंत्रणा तात्काळ घटना स्थळी पोहचून ती व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली असता पंचनामा करताना त्याच्या कमरेचे जवळ भयंकर जखमा दिसून आल्या. चानी पोलिस ठाणेदार रवींद्र लांडे, पोलिस सुनील भाऊ भाकरे, सुधाकर करवते जायभाय मेजर, शिवा स्वामी आदीनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहेत.
0 टिप्पण्या