भगवान महावीर यांच्या निर्वाण वर्षानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन
अकोला : भगवान महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण वर्षानिमित्त शहरात सकल श्वेतांबर जैन समाजाच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, याचा प्रारंभ गुरुवार, ३१ ऑक्टोबरपासून होत असल्याची माहिती समितीच्या वतीने संभवनाथ जैन मंदिर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भगवान महावीर निर्वाण महामहोत्सवाचे मुख्य लाभार्थी चंपाबेन फतेचंद कोठारी परिवार हस्ते सतीश शाह राहणार आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी समस्त जैन बांधवांच्या वतीने २५५० ग्रामचा निर्वाण लड्डू सुंदर सजावट करून सर्व जैन मंदिरावर चढविण्यात येणार आहे. ३ नोव्हेंबर रविवार रोजी समस्त जैन संघाच्या वतीने भगवान महावीर यांची पूज्य साधू, साध्वी व भगवंत यांच्या उपस्थितीत भव्य रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे.महिला मंडळाच्या वतीने सामूहिक सांजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भगवंतांचे संयुक्त प्रवचन होऊन तपस्वी स्मिता काकरिया यांच्या तपस्येचे अनुमोदन होणार आहे. ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत गांधी चौक येथे भगवान महावीर निर्वाण स्थळ पावापुरी जलमंदिराचा देखावा साकार करण्यात येणार आहे. या पावापुरी जल मंदिराचे मुख्य लाभार्थी म्हणून प्रेमचंद भिखाभाई शाह परिवार हस्ते लेबेन लॅब राहणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी आदिनाथ जैन मंदिरात सकाळी प्रमुक्ती साधना शिबिर होणार असून, ५ नोव्हेंबर रोजी महिला मंडळाच्या वतीने सामूहिक सांजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी भगवंतांचे संयुक्त प्रवचन होऊन तपस्वी स्मिता काकरिया यांच्या तपस्येचे अनुमोदन होणार आहे. ५ ते १० नोव्हेंबरपर्यंत गांधी चौक येथे भगवान महावीर निर्वाण स्थळ पावापुरी जलमंदिराचा देखावा साकार करण्यात येणार आहे. या पावापुरी जल मंदिराचे मुख्य लाभार्थी म्हणून प्रेमचंद भिखाभाई शाह परिवार हस्ते लेबेन लॅब राहणार आहे.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या