विरोधकांचा नकारात्मक अपप्रचाराला उत्तर देऊन जनसंपर्क अभियान राबवावा- पूनम प्रमोद महाजन
अकोला समाज आणि राष्ट्र सोबत मानवता व संस्कृती, संवर्धन एकता व परंपरा कायम राखण्यासाठी या देशाची ओळख राखण्यासाठी आपण सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित येऊन आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने मतभेद विसरून एक मोठ्या उद्देशाने एकत्रित येणारे कार्यकर्ते असून समाज व राष्ट्र समर्पित कार्यकर्त्यांनी विरोधकांचा नकारात्मक अपप्रचाराला उत्तर देऊन जनसंपर्क अभियान राबवावा अशी आव्हान माजी खासदार पूनम प्रमोद महाजन यांनी केले स्थानिक ग्रीनलँड कॉटेज इथे भाजपा कार्यकर्त्यांची संवाद साधताना त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदेश भाजपा सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर हे होते तर मंचावर खासदार अनुप धोत्रे किशोर पाटील आमदार वसंत खंडेलवाल विजय अग्रवाल जयंत मसने अर्चनाताई मसने चंदाताई शर्मा माधव मानकर एडवोकेट देवाशिष काकड, सिद्धार्थ शर्मा एडवोकेट सुभाष सिंग ठाकूर सजयगोटफोडे कृष्णा शर्मा हरीश आलम चंदानी डॉक्टर आधी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माजी खासदार पूनम महाजन यांनी प्रमोद महाजन यांच्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची संवाद साधून जुन्या गोष्टींना उजाळा दिला व महायुतीच्या कामकाजाची माहिती देऊन केवळ 45 दिवस पक्षासाठी देऊन महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनतेच्या विकासासाठी आपण भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सरकारला विजयी करा यावेळी त्यांनी अनुप धोत्रे यांचे सुद्धा अभिनंदन केले स्वर्गीय गोवर्धन शर्मा व माजी खासदार संजय भाऊ धोत्रे यांच्या कार्याची सुद्धा त्यांनी प्रशंसा केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट देवाशिष काकड यांनी केले यावेळी महानगर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या