Ticker

6/recent/ticker-posts

शक्ती आणि भक्ती याचे प्रतीक नवरात्र ही प्रेरणादायी- आमदार रणधीर सावरकर

शक्ती आणि भक्ती याचे प्रतीक नवरात्र ही प्रेरणादायी- आमदार रणधीर सावरकर 



अकोला सनातन काळापासून आईला आणि ईश्वर मातृ शक्तीला महत्त्व असून मा दुर्गा भारत माता शारदा देवी मा जिजाऊ अहिल्याबाई मा रमाबाई, सावित्रीबाई फुले तसेच प्रथम गुरु आईला मानणारा हा धर्म असून नवरात्र हा उत्सव याला शास्त्रीय आणि वैज्ञानिक धार्मिक महत्त्व असून या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नऊ दिवस पाण्यावर उपास करून तसेच लाखो उपास करून मौन धारण करून शक्तीचा ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतात आणि शक्ती ही देवीची प्रतीक असून प्रत्येक कार्यामध्ये, मातृशक्तीचा सहभाग असल्याशिवाय कोणतेही काम यशस्वी होत नाही आणि यासाठी महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण तसेच बहीण साठी 50% एसटी सवलत मोफत शिक्षणाची सोय व वेगवेगळ्या योजना सुरू केले आहे शक्ती आणि भक्ती याचे प्रतीक नवरात्र ही प्रेरणादायी असल्यामुळे याला वैज्ञानिक कारण असून या काळामध्ये उपास आणि आराधना महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. नवरात्राच्या पर्वावर वेगवेगळ्या मंडळांना भेटी देऊन मातृशक्ती आणि युवाशक्ती यांचं अभिनंदन करून भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव तसेच दांडिया रास व वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्यांना अभिनंदन करून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये अनेक मंडळांना त्यांनी भेटी दिल्या यावेळी त्यांच्यासोबत खासदार अनुप धोत्रे विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने माधव मानकर शंकरराव वाकोडे अंबादास उमाळे राजेश बेले दादाराव पेठ , अनिल गावंडे पंकज वाडीवाले एडवोकेट देवाशिष काकड प्रशांत अवचार सुभाष खंडारे डॉक्टर किशोर मालोकार संजय गोटफोडे, गीतांजली शेगोकार वैशाली शेळके स्मिताताई राजनकर गजानन नळकांडे केशवराव ताथोड, हिरासिंग राठोड अशोक चव्हाण, अजय शर्मा सतीश ढगे सारिका जयस्वाल चंदा शर्मा आधी समवेत होते



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या