जागर स्त्री शक्तीचा जागर महिला सन्मानाचा
नवरात्री उत्सवाच्या पावन काळात पश्चिम-उत्तर मंडळामधे आदर्श नवदुर्गा उत्सव मंडळ, प्रिया टॉवर, डाबकी रोड येथे महाआरती घेण्यात आली. तसेच श्री साक्षी गोपाल मंदिर, मेहरे नगर, डाबकी रोड येथे देविरुपातील नवकन्याचा सत्कार व विविध क्षेत्रातील लाविण्यपुर्ण कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला यावेळी आदरणीय सौ सुहासिनीताई धोत्रे, सौ मंजुषाताई सावरकर, सौ अर्चनाताई शर्मा, सौ चंदाताई शर्मा, सौ सुमनताई गावंडे, सौ अश्विनीताई हातवळने, आराधनाताई शर्मा, सौ वैशालीताई शेळके, सौ रंजनाताई विंचनकर, माधुरीताई क्षिरसागर, विजयाताई देशमुख, साधनाताई येवले, सौ ज्योतीताई मानकर, सुनिताताई दळवी, रश्मीताई कायंदे, सोनालीताई जानोरकर, सौ उंबरकर, शिल्पाताई लहरीया, नम्रताताई जोशी, अनुजाताई देशमुख, सारिकाताई देशपांडे, संतोष शर्मा स्वाती देशपांडे कार्यक्रमाचे संचालन सौ अपर्णाताई जोशी व सौ रेश्माताई कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमांमध्ये सुषमा दीदी भानुप्रिया, मेघाताई जोशी, आशाताई नाहे, जयाबाई वाघ, देशमुख काकू, रेखाताई भटुरकर, सुनीताताई लांडगे, ज्योतीताई मलिये, डॉ.मेघा मोगरे, डॉ. छाया देशमुख, डॉ पारस्कर, ad. कविता मुंडे, ad.रूपाली जोशी, कादंबरीताई खापरे, डॉ. तृप्ती भाकरे यांना शाल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. देवीची नऊ रुपे धारण करून आलेल्या कन्या कस्तुरी जोशी, मनश्री बाठे, ईश्वरी उज्जैनकर, लावण्या अनासाने, ज्ञानदा दांदळे, पियुष्णा झाडे, शर्वरी वानखडे, धनश्री काकड, शर्वरी बोराकडे, तन्वी राठोड, राघवी कुलकर्णी यांचे कौतुक करून मान्यवरांनी सत्कार केला. सौ रंजनाताईंनी आयोजित केलेल्या हया गरबा उत्सवात सर्व मान्यवरांनी नृत्य करून सहभाग घेतला.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487
0 टिप्पण्या