एक देशी कटस्यासह व जिवंत राउंड जप्त पोलीस स्टेशन अकोट शहर डीबी पथकाची धडक कार्यवाही
डिबी पथक प्रमुख पोउपनि अख्तर शेख पो. स्टे अकोट शहर हे दिनांक २९/१०/२०२४ रोजी डिबी पथक पोस्टॉफ यांचे सह पो. स्टे परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की फरकाडे नगर येथे राहणारा शरद अशोक सहारे हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचे उद्देशाने त्याचे जवळ अवैदयारित्या देशी कट्टा (पिस्टल अग्नी शस्त्र) बाळगुन रेल्वे स्टेशन वर बसलेला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून सदरची माहिती वरीष्टांना देवून त्यांनी आदेशीत केल्यावरून पंच व पोस्टाफ सह रेल्वे स्टेशन चे आत मध्ये जावुन पाहणी केली असता एक ईसम रेल्वे स्टेशन वर एका बाकड्यावर बसलेला दिसुन आला. त्यास पोलीस व पंचाचा परीचय देवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव शरद अशोक सहारे वय ३० वर्ष रा. फरकाडे नगर अकोट असे सांगितले वरून त्याची अंगझडती घेण्याचा उददेश समजावुन सांगुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे कमरेत मागच्या बाजुला एक लोखंडी धातुचा देशी कट्टा (पिस्टल अग्नी शस्त्र) त्याला काळया रंगाची फायबर ची उभ्या लायनींगची पिस्टल ग्रीप दिसुन आली सदर देशी कट्टा मधुन मॅक्झीन वेगळी करून पाहणी केली असता सदरची मॅक्झीन खाली मिळुन आली सदर देशी कटटयावर कोणत्याही प्रकारचे कंपनीचे मार्क मिळुन आले नाही. तसेच त्याचे अंगातील लोअर चे उजवे खिशात एक तांब पितळं चा अं. ९ एमएम आकाराचा जिवंत राऊंड मिळून आला आम्ही व पंचानी खात्री करून शरद सहारे यास देशी कट्टा (पिस्टल अग्नी शस्त्र) बाळगण्याबाबत परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचे पंचासमक्ष सांगितले तसेच देशी कट्टा कोठुन आणला याबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडविची उत्तरे दिली वरून पंचासमक्ष ताब्यात घेतलेला देशी कट्टा (पिस्टल अग्नी शस्त्र) व जिवंत काडतुस किंमत अं. २०,०००/-रू चा मुद्देमाल आरोपी कडून जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे, श्री अनमोल मित्तल साहेब सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागिय पोलीस अधिकारी अकोट, पोलीस निरीक्षक अमोल माळवे यांचे यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी. पथक प्रमुख पोउपनि अख्तर शेख पोहेकॉ गणेश सोळंके, पोहेकॉ नरेंद्र जाधव, नापोकॉ विपूल सोळंके, पोकॉ बजरंग इंगळे, पोकॉ मंगेश खेडकर, पोकॉ नितेश सोळंके, पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली असून पुढील तपास पोउपनि वैभव तायडे हे करीत आहेत
0 टिप्पण्या