Ticker

6/recent/ticker-posts

आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोल्यात

आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारांच्या प्रचारार्थ अकोल्यात 


अकोला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले च्या महायुती उमेदवाराच्या प्रचारार्थ आंतरराष्ट्रीय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 किंवा 13 नोव्हेंबर रोजी राज राजेश्वर नगरीमध्ये येत असून पश्चिम विदर्भाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहे तसेच केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, स्टार प्रचारक आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वा शर्मा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चव्हाण , पंकजाताई मुंडेयांच्या सभा अकोला लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे या दृष्टीने महायुतीच्या तर्फे जय्यत तयारी आहे. अकोल्यात पंतप्रधानांची सभेच्या दृष्टीने नियोजन सुरू असून वेगवेगळ्या ठिकाणी सभासाठी भारतीय जनता पक्ष महायुतीतर्फे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या चा वाटप करण्यात आला आहे. अशी माहिती अकोला भाजप प्रसिद्धीप्रमुख गिरीश जोशी यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या