Ticker

6/recent/ticker-posts

महिलेला जाळण्याचा प्रयत्न : आरोपी कारागृहात, चान्नी ठाणे हद्दीतील विवरा येथील घटना

महिलेला जाळण्याचा प्रयत्न : आरोपी कारागृहातचान्नी ठाणे हद्दीतील विवरा येथील घटना 

 प्रतिनिधी- नासीर शेख
अकोला : चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत विवरा येथे महिलेचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील सोन्याची पोत तोडून , तिला व तिचा मुलगा असे दोघांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आलेगाव येथील आरोपी पत्रकार सचिन मुर्तडकर याला गुरुवार १० ऑक्टोंबर रोजीच्या दुपारी अकोला येथून अटक केली आहे. आलेगाव येथील पत्रकार सचिन मुर्तडकर यांनी महिला व तिचा मुलगा दोघांच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना ३० सप्टेंबर रोजीच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली होती.याच वेळी पत्रकार सचिन मुर्तडकर यांनाही काही जणांनी लोखंडी रॉडने हल्ला केला होता. या प्रकरणी ३० सप्टेंबर रोजी महिलेच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. तसेच पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्या जबाबावरून १ ऑक्टोंबर रोजीच्या रात्री विवरा येथील सचिन पजई, स्वप्निल पजई, प्रफुल कुरई, आकाश झोडपे, दारासिंग पजई, व एक महिला असे सहा जणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आरोपी पत्रकार सचिन मुर्तडकर याला १० ऑक्टोंबर रोजी अटक करून ११ ऑक्टोंबर रोजी पातूर न्यायालयात हजर केले असता,त्याला कारागृह मध्ये रवानगीचे आदेश न्यायालयाने दिले आहे.पुढील तपास ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक संजय कोहळे करीत आहे.


प्रतिक्रिया 
महिला व तिच्या मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न तसेच पत्रकारावर हल्ला याप्रकरणी परस्पर दोघांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यातील गंभीर गुन्ह्यातील आरोपी सचिन मूर्तडकर याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपासाची प्रक्रिया सुरू आहे.
रवींद्र लांडे ठाणेदार पोलिस स्टेशन चान्नी


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या