Ticker

6/recent/ticker-posts

रेल्वे प्रवाशांना सुविधा नवरात्र व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक्सप्रेसचा थांबा

रेल्वे प्रवाशांना सुविधा नवरात्र व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर एक्सप्रेसचा थांबा


अकोला रेल्वे प्रवाशांना सुविधा मिळावी व नवरात्राच्या व दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मुर्तीजापुर आणि बोरगाव या परिसरातील नागरिकांना खासदार अनुप धोत्रे यांनी भेट देऊन पुणे नागपूर ही एक्सप्रेस चा थांबा मुर्तीजापुर ला देण्याचा निर्णय मंजूर करून तसेच बडनेरा नाशिक रोड ही गाडी बोरगाव मंजू येथे थांबा मिळवण्यात यश मिळवला आहे. अनेक दिवसाची मागणी होती की मुर्तीजापुर शहरातून अमरावती यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात त्यांना सुविधा व्हावी तसेच मुर्तीजापुर यांची मागणी लक्षात घेता खासदार अनुप धोत्रे यांनी देशाचे रेल्वेमंत्री नामदार अश्विन वैष्णव यांच्याकडे मागणी करून पुणे नागपूर व नागपूर पुणे गाडी क्रमांक 12 135, 12 136 याला थांबा मिळवला आहे त्यामुळे मुर्तीजापुरांची करांची अनेक दिवसाची मागणीची पूर्तता झाली आहे यासंदर्भात आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा खासदार अनुप धोत्रेकडे यासंदर्भात मागणी केली होती. बडनेरा नाशिक रोड बोरगाव मंजू इथे पॅसेंजर चा थांबा मिळवून बोरगाव मंजू पंचकोशीतील नागरिकांना रेल्वेची सुविधा प्राप्त होण्यासाठी त्याचा थांबा मिळवण्यात सुद्धा खासदार धोत्रे यांना यश मिळाला आहे झिरो बारा अकरा झिरो बारा बारा या गाडी चा थांबा देण्यात आला आहे या संदर्भात रेल्वे विभागाने मध्यव रेल्वेची मुंबई आदेश काढून तत्काळ दसऱ्याची भेट दिली आहे अनेक रेल्वे प्रवासांनी खासदार अनुप धोत्रे यांची मागणी मंजूर केल्याबद्दल सरकारची व अनुप धोत्रेंचे आभार व्यक्त केले आहे तसेच त्यांनी केलेल्या अनेक मागण्या लवकरच पूर्ण होणार असा विश्वास रेल्वे प्रवासी संघटनेने व्यक्त केला आहे


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या