Ticker

6/recent/ticker-posts

गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या अकोल्यातील डीजे बँड ट्रकचा भीषण अपघात

गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या अकोल्यातील डीजे बँड ट्रकचा भीषण अपघात 



 प्रतिनिधी- नौशाद पटेल 
अकोला बुलढाणा मार्गावर चिखली तालुक्यातील उंदरी अमळापूर जवळ गणपती विसर्जनासाठी जात असलेल्या डीजे ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना आज 17 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान घडली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी जात असलेला अकोला येथील प्रसिद्ध भारत धमाल बँड पार्टी डीजे ट्रक सह 25 ते 30 बँड पथकातील युवक प्रवास करीत होते. दरम्यान चिखली जवळील उंदरी अमळापूर जवळ अचानक ट्रकचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाल्याची सुत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातामध्ये सर्वच युवक जखमी असून चार ते पाच गंभीर तर एका युवकाचा अपघातादरम्यान जागीच मृत्यू झाला आहे. सर्व जखमी युवकांना चिखली येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल होऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या