श्री गणेश विसजर्नाच्या अनुषंगाने भिकुंड बंधारा बाळापुर आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक सज्ज
अकोला
श्री गणेश विसर्जन दरम्यान कोणतीही अनुचित घटना टाळण्याचे अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार व उपविभागीय अधिकारी बाळापुर व तहसीलदार बाळापुर यांचे मार्गदर्शनामध्ये जिल्हा प्रशासनाचे वतीने नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार दि.१७/०९/२०२४ रोजी आयोजित गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने नदी व बंधा-याच्या ठिकाणी शोध व बचाव पथक सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यानुसार भिकुंड बंधारा ता.बाळापुर येथे जिल्हा शोध व बचाव पथक व वंदे मातरम आपत्कालिन बचाव पथक रात्रभर सज्ज ठेवण्यात आले आहे.त्यांचे सोबत बोट , लाईफ जॅकेट ,लाईफ रिंग , सर्चलाईट, दोर इत्यादी साहीत्य सोबत आहे. सदर पथकामध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रशांत सायरे,सुनिल कल्ले , वंदे मातरम आपत्कालिन पथकाचे उमेश आटोटे, मनिष मेश्राम , गौतम मोहोड , प्रदीप मोहोड ,उपस्थित आहेत.
0 टिप्पण्या