अकोला पूर्व मतदार संघातील बोरगांव(मंजु) येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.. आमदार सावरकर यांचा वचनपूर्ती व जनतेला समर्पित कार्यक्रम मतदार संघातील विकास कामाला गती
अकोला- अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील मतदार हा आपला देवत असून त्याच्या भावना त्याच्या इच्छा त्या परिसरातील विकास मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे आपले कर्तव्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात देशात राज्यात विकास कामाला गती मिळाली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व विविध विभागातील मंत्री विदर्भाच्या विकासासाठी सातत्याने निधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागाचा विकास एकमेव लक्ष ठेवून कार्यरत असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले. रणधीर भाऊ सावरकर, आमदार अकोला पूर्व विधानसभा मतदार संघ यांच्या प्रयत्नाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग NH (O) अंतर्गत, अर्थसंकल्पीय बजेट, आमदार स्थानिक विकास निधी, शासन निधी २५१५, तांडा वस्ती, दलीतोत्तर शासन निधी व अल्पसंख्यांक निधी अंतर्गत मंजूर कामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक १९/९/२०२४ रोजी संपन्न झाला आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार अनुप धोत्रे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अंबादास उमाळे, देवेंद्र देवर प्रवीण हगवणे पंकज वाडीवाले सुधाकर गमे सागर तायडे बंटी भाऊ मांगे सुबोध गवई अंबु अग्रवाल रवींद्र ढवळे मुरली चौरे सागर धुलिया कृतिका अनासने प्रशांत उगले सुहास भाऊ सोनवणे दिनू भाऊ मोरे बाळू भाऊ देशमुख गजानन इंगळे गजानन उगले गजानन दिपके दिगंबर गावंडे सुनील भाऊ चिंतामणी दिलीप गांजरे राजेश गमे सुनील चव्हाण श्रीकांत पांडे छोटू बापू देशमुख राजू आस्वार निलेश कटाले हे प्रामुख्याने उपस्थित होते.
विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन शुभ हस्ते मा. आमदार श्री रणधीरभाऊ सावरकर करण्यात आले विकास कामासाठी व मतदारांप्रती जागृत राहणे त्यांच्या भावना सोबत विकास कामांसाठी जनतेला उपयोगी कामे करण्यासाठी तसेच लाडकी बहीण व मातृशक्तीला मोफत शिक्षण एसटीमध्ये सवलत शेतकऱ्यांना मदत महायुती करू शकते. परंतु केवळ गप्पांचा बाजार न करता प्रत्येक कामात अडथळा निर्माण करणे, दिवस रात्र त्यांना भाजपा नेते दिसणे एकमेव उद्योग व बदनाम करणे हा प्रकार राजकारणातला खालच्या स्तरातला जिल्ह्यात व राज्यात सुरू झाला असून उबाठासेना नेत्यांचा एकमेव उद्योग असून जनता जनार्दन त्यांच्या वृत्तीला व कामाला ओळखल्यामुळे भाजपाला बदनाम करणे एकमेव उद्योग घेऊन कार्यरत आहे अशा तत्त्वापासून सावध राहण्याची गरज आहे बंगलादेश व इतर घटनेपासून जनतेने बोध घ्यावा व राष्ट्रचेतना पहेरी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस महायुती सरकारला आगामी विधानसभेमध्ये प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन खासदार अनुप धोत्रे यांनी केले.
पुर्वीचा राष्ट्रीय महामार्ग बोरगांव शहराच्या बाहेरून गेल्याने जुना मार्ग खराब झाल्याने हा महामार्ग सुधारणा करण्यासाठी केंद्रीय महामार्ग विकास मंत्री मा. नितीन जी गडकरी यांच्या कडे मागणी करण्यात आली होती, बोरगाव मंजु गावातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणे लांबी ४.७ कि.मी. (किंमत ७१४ लक्ष रुपये)
बोरगाव मंजु ते डेअरी फार्म पोच रस्ता ग्रा.मा.२६ कि.मी. ०/०० ते २/७०० ची सुधारणा करणे (कि. २१८.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे तेलगन संस्था जवळ सभामंडप बांधकाम करणे (किंमत १५.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे श्याम राऊत यांच्या गोठ्यापासून मंगेश निवाने यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रेट करणे (किमत ८.०० लक्ष रु.)
तांडा वस्ती अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रीट करणे (किंमत १०.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे मातंग समाज सभागृहाला आवार भिंत व पेव्हर ब्लॉक बसविणे (किंमत १०.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे शालिग्राम विल्हेकर ते नांदुरकर यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे (किमत १०.०० लक्ष रू)
बोरगाव मंजू येथे गजानन सोनवणे ते वानखडे यांच्या गोठ्यापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रेट करणे (किमत १०.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे अल्पसंख्यांक वस्ती अंतर्गत सुनील जैन ते राजेंद्र जैन यांच्या घरापर्यंत रस्ता सिमेंट काँक्रेट करणे (किंमत १०.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे जय बजरंग बली हरीपाठ मंडळाकरिता सभागृह बांधकाम करणे (किंमत १०.०० लक्ष रु.)
बोरगाव मंजू येथे जुने गजानन महाराज मंदिराजवळ सभामंडप बांधकाम करणे (किंमत १०.०० लक्ष रु.).. असे एकूण 11 कामांचे भूमिपूजन करण्यात आले व बोरगाव मंजू परिसर विकास कामाला आमदार रणधीर सावरकर यांनी गती दिली याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचे स्वागत करून बोरगाव मंजूच्या इतिहासात सर्वात जास्त निधी देणारा लोकनिधी म्हणून गौरव केला....
0 टिप्पण्या