हवामान अभ्यासक पंजाब डक यांची उमरा येथे भेट, शेकडो शेतकऱ्यांना पावसाबद्दल दिले मार्गदर्शन
प्रतिनिधी नासीर शेख
पातुर तालुक्याच्या उमरा येथील फौजी राजेंद्र रामदास चिपळे यांनी ३२ वर्ष देशाच्या सुरक्षेतेसाठी सीमेवर सेवा दिली अनु आपल्या जन्मभूमी उमरा येथे परतले त्यानिमित्ताने गावकऱ्यांनी सेवानिवृत्त फौजी राजेंद्र चिपळे यांचा स्वागत करून कार्यक्रमाचे आयोजन केले,आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हवामान बद्दल माहिती उपलब्ध व्हावी या उद्देशाने जेष्ठ समासेवक विलास हरमकार
यांनी पंजाबराव डक यांच्याशी संपर्क करून त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन साठी उमरा येथे कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली, पंजाब डक यांनी सोमारी कार्यक्रमाला भेट देऊन शेकडो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले,२१ सप्टेंबर नंतर मुसळधार पावसाचा अंदाज शेतकऱ्यांना सांगितला,आणि सेवानिवृत्त झालेले फौजी राजेंद्र रामदास चिपळे यांचा सत्कार केला,यावेळी उमरा व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या