महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर मूर्तिजापुर नगरीत- डॉ. सुगत वाघमारे यांची माहिती
प्रतिनिधी - नागोराव तायडे
मुर्तिजापूर तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटीद्वारे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा 'खेळ मांडीयला' कार्यक्रम मूर्तिजापूर येथे आयोजित केला असून या निमित्ताने आदेश बांदेकर यांची मूर्तिजापूर येथे प्रथमच एन्ट्री होत आहे.
हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वदूर परिचित आहे. सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर आपल्या सर्वच वाहिनीसाहेबांना भेटण्यासाठी येत असल्याने माता भगिनींनी २१ सप्टेंबरला दुपारी ३ वाजताची वेळ नोंदवून ठेवावी. आपल्याला मूर्तिजापूर येथे खेळ मांडीयला या खेळामध्ये सहभागी व्हायचे आहे.
शनिवारी 'खेळ मांडीयला' कार्यक्रम
अशी आग्रहाची विनंती आपला भाऊ डॉ. सुगत वाघमारे यांनी केली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता भगिनींना चार क्षण विरंगुळा मिळावा, या हेतूने डॉ. सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रमहोणार आहे.
विशेष तो एडिशन करतो म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी केले आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये डॉ. सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती या निमित्ताने भागधारक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
0 टिप्पण्या