हमज़ा प्लॉट येथुन ईद मिलाद उन-नबी निमीत्त निघाला फार मोठा ज़ुलस
प्रतिनिधी- नौशाद पटेल
इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईनं सजवल्या जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं. इस्लाममध्ये दान करण्याला मोठं महत्व आहे, त्यामुळे ठिकठिकाणी ईद-ए-मिलाद-उन-नबी च्या निमित्ताने आजच्या दिवशी अन्नदान करण्यात आले. यावेळी जुने शहर अकोला हमज़ा प्लॉट येथुन फार मोठा ज़ुलस काढण्यात आला होता. यावेळी मौलाना अशपाक रज़ा साहब, मजीनगरसेवक अबरार हुसेन सैय्यद अनवर उर्फ अन्नू अबुज़ार अहमद, मोहम्मद साकिब ते यावेळी सहकार्य लाभले.
मुस्लिम समाजच्या वतीने अकोला शहातील फते चौक, मोहम्मद अली चौक, खुले नाट्यगृह, गांधी चौक, जुने शहर मार्गावरून मोठा ज्यूस काढून "ईद ए मिलाद उल्हासात साजरी करण्यात आली. आज गुरवार रोजी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्ग वरून प्रस्थान करीत मुस्लिम समाजातील धर्मगुरूंसह निघालेल्या मिरवणूक मध्ये मुस्लिम समाजातील प्रत्येक जण, लहान मुले, जेष्ठ नागरिक सर्व अत्यंत शिस्तीने सहभागी झाले. यावेळी पवित्र मक्का मदिना मश्जीतची तयार केलेली प्रतिकृती ने समस्त जनतेला आकर्षित केले होते, मिरवणूक च्या मार्गावर विविध ठीक ठिकाणी विविध संघटना, पक्ष, यांच्या वतीने नाश्ता, चहा, पाणी ची व्यवस्था करण्यात आली होती, विविध घोष वाक्य मिरवणुकीत लहान चिमुकल्या मुलाकडून दुमदुमत होते, शेवटी सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन जय हिंद चौक परीसरात या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला.
0 टिप्पण्या