Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील प्रत्येक गावात, वस्तीत अभ्यासिका निर्माण करा- शंकर कंकाळ

राज्यातील प्रत्येक गावात, वस्तीत अभ्यासिका निर्माण करा- शंकर कंकाळ 



अकोला. मागास व अती मागास वर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेऊन अधिकारी होता यावे यासाठी सर्व स्पर्धा परीक्षा आणि त्याची तयारी करण्यासाठी प्रत्येक गावात आणि वस्तीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अभ्यासिका निर्माण व्हावे यासाठी शासनाने प्रति अभ्यासिका आणि संविधान सभागृहासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करून हा निधी राखीव ठेवावा अशी मागणी मिशन आभासिका महासंघ चे संस्थांपक शंकर कंकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.



 महाराष्ट्र राज्यातील गावंमध्ये प्रत्येक वस्त्यांमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी २ मजली डिजिटल अभ्यासिका झाल्या पाहिजेत, गावं व शहरी व प्रत्येक वस्त्यांमध्ये डिजिटल अभ्यासिकासाठी शासनाने ग्रामपंचायत पातळी वर, नगर परिषद, नगरपालिका आणि महानगर पालिका क्षेत्रात ५० लाख रुपये निधी शासनाने राखीव ठेवून तो निधी देऊन त्वरित उपलब्ध करून द्यावा. संविधान सभागृहात अभ्यासिका सह बांधकाम करून द्यावे. या मागणीसाठी २३ सप्टेंबर रोजी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचीही माहिती शंकर कंकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पवन कनोजिया, रेखाताई घरडे, आनंद मानकर बाळासाहेब इंगळे हरणाम सिग रोहेल, अमन घरडे संतोष वैद्य आदींची उपस्थिती होती.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या