वाॅटर रेस्क्यु क्राफ्टसह रेस्क्युबोट रेस्क्यु टीमसह गांधीग्राम येथे पुर्णा नदीवर सज्ज
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर ची टीम वाॅटर रेस्क्यु क्राफ्ट आणी रेस्क्यु बोट,शोध व बचाव साहित्य आणी रुग्णवाहीकासह पुर्णा नदीपात्रात गांधीग्राम येथे सज्ज झाली आहे.
आज 1 सप्टेंबर 2024 जिल्हाधिकारी अजित कुंभार सर यांच्या आदेशानुसार आरडीसी विजय पाटील सर यांच्या उपस्थितीत उप-विभागीय अधिकारी डाॅ.शरद जावळे सर यांचे मार्गदर्शनात अकोला तहसीलदार सुरेश कव्हळे सर,नायब तहसीलदार महेंद्र कुमार आत्राम सर,नायब तहसीलदार राहुल वसावे सर,आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमचे मं.अ.हरीहर निमकंडे,दिपक सदाफळे जिवरक्षक,मं.अ प्रशांत सायरे,मं.अ.श्रावण भराडी,तलाठी सचिन चिकार,मं.अ.दत्तात्र्यय काळे,दिपक राऊत,सुनिल कल्ले,यांचेसह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी ज्ञानेश्वर म्हसाये,मयूर सळेदार, अंकुश सदाफळे,निलेश खंडारे,विकास सदांशिव, निखील बोबडे,दिपक गांजरे,आशिष गुगळे,विष्णु केवट,धिरज राऊत,शेखर केवट,अमर ठाकूर,हे सज्ज झाले आहे उद्याचा श्रावणातील पाचवा सोमवार असल्याने गांधीग्राम येथील पुर्णा नदीवर कावडधारी शिवभक्त जलाभिषेक नेण्यासाठी मोठ्याप्रमाणात येऊ शकतात झालेल्या दमदार पावसामुळे पुर्णा नदीला मोठा पुर असल्याने नदी दुथळी भरुन वाहत आहे याची दक्षता घेऊन पुर्व तयारीनिशी यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे या ठीकाणी दहीहांडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार ठाकरे साहेब आणी पोलीस कर्मचारी मोठ्याप्रमाणात बंदोबस्त लाऊन आहेत अशी माहीती अकोला आ.व्य.अ.संदीप साबळे यांनी दीली आहे.
0 टिप्पण्या