जनतेच्या सदैव सेवेत कार्यरत असणारे पोलीस बांधव करतात विविध समस्यांचा सामना
शिस्तप्रिय असलेल्या पोलीस खात्याच्या नावावर होते पिळवणूक... पोलीस बांधवांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक ३ सप्टेंबरपासून आमरण उपोषण
अकोला - सर्वसामान्य जनता आपल्या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करून शासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत समस्यावर मार्ग काढत असतात तर विविध खात्याचे सुद्धा कर्मचारी संप, आंदोलन करून आपल्या समस्या शासनाकडून सोडवून घेत असतो.मात्र पोलीस खाते हे शिस्त प्रिय खाते असून जनतेच्या सरळ संपर्कात असणारे खाते आहे. त्यामुळे या खात्यातील पोलीस शिपाई, पोलीस अधिकारी कधीच आंदोलन करीत नाही. याचा अर्थ त्यांना काहीच समस्या नाहीत. असा घेणे पूर्णतः चुकीचे आहे. पोलिसांना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. आणि ह्याच समस्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पोलिसांसाठी उद्या दि. ३ सप्टेंबर रोजी अशोक वाटीका येथून पैदल मार्च करीत व जिल्हाधिकारी कार्यालय गाठतील तसेच जिल्हाधिकारी यांना समस्या सोडविन्यासाठी निवेदन सादर करून ३ सप्टेंबरपासून आमरण उपोषणास प्रारंभ करतील. अशी माहिती महाराष्ट्र बॉईज संघटना च्या वतीने श्री आशुतोष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
आपल्या हक्काची मागणी:-
१. पोलिसांना दिवाळी बोनस देण्यात यावा.
२. पोलिसांचा पगाराचे जे कटोती टॅक्स फ्री करण्यात यावे
३. जुनी पेन्शन सुरु करावी
४. महाराष्ट्र पोलिसांची ८ तास इयुटी करावी.
५. पोलीस पाल्य चे प्रमाणपत्र वडील ड्युटीवर असतानाच देण्यात यावे.
६. पोलीस बॉइज़ ला १५ % आरक्षण देण्यात यावे.
ও. पोलीसाची ८ ते १० तासाच्या वर डयटी होत असेल तर तासिका प्रमाणे भत्ता देण्यात यावे .
८. पोलीस खात्यातून रिटायर्ड झाल्यावर देखील हॉस्पिटल चा लाभ देण्यात यावा.
९. पोलीस कर्मचारी व अधिकारी ह्यांच्यावर मुजोरी व मारहाण करणान्यास कठोर कारवाई करण्यात
यावी व त्या साठी नवीन कायदा स्थापित करण्यात यावा.
१०. पोलीस महिलांना लक्ष्मीपूजन व रक्षाबंधन या सणाच्या दिवशी सार्वंजिक सट्टी देण्यात यावी.
११. महिला पोलिसांना प्रेग्नन्सी मधे सुट्टी अजून २ महिने वाढून देण्यात यावी.
१२.पोलीस महामंडक व मतदार संघ स्थापन करण्यात यावं
१३. पोलीस मधील स्पोर्ट खेळणाऱ्याला विशेष अनुदान वाढून देण्यात यावं
१४. प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी सेवानीवृत्त झाल्या नंतर त्यांच्या वाहनाला टोल मुक्त करण्यात यावे
१५. २००६ चे बॅँचचे २ टायर्स है एरिअस पैसे अद्याप मिळाले नाहीत ते देण्यात यावे
१६. पोलीस सेवानीवृत झाल्या नंतर त्याच तारखेला पेन्शन व सर्व पैसे देण्यात यावे
१७. पोलीस पत संस्था मधील व्याज दर ८% पेक्षा कमी आकारण्यात यावी
१८. ग्रामीण पोलिस वसाहतीचे पुनर्निर्मान करण्यात यावे
१९. घर बाधकामाकरिता कमी कालावधी मधे लोन उपलब्ध करुन देण्यात यावे.
इच्छुक असलेल्या व लोनसाठी अर्ज सादर केलेल्या कर्मचारी यांना कमी कालावधीमध्ये लोन उपलब्ध करून देण्यात यावे.
२०. पोलीस कर्मचारी व अधिकारी ऑन इयुटी कुटल्याही कारणास मरणपावल्यास त्या कर्मचारी वअधिकारी यांच्या परिवारास शासनाने किंवा प्रशासनाने त्यांना मोठी रक्कम तात्काळ देण्यात यावी.
२१. पोलिस पत संस्था मधे पात्रता असलेल्या पोलीस बॉइज़ ह्यांना घेण्यात यावे.
२२. दोन महिन्याचे अगाऊ वेतन देण्यात यावे (शनिवार व रविवार )
२३. २०१३ विभागीय परीक्षा पास झालेल्या सर्व अंमलदारांना लवकरात लवकर पु्ढ़ील पदोत्रती द्यार्वी आदी मागण्यासाठी उद्या ३ सप्टेंबर पासून आमरण उपोषणास बसणार आहेत. अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी
विदर्भ अध्यक्ष आशुतोष विवेक चव्हाण,महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना,अकोला जिल्हा अध्यक्ष अक्षय अरविंद वानखडे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष गौरव अशोकराव सपकाळ,अकोला जिल्हा अध्यक्ष ( युवक आघाडी ) . अजय विजय शेगोकार ,अकोला जिल्हा उपाध्यक्ष ( युवक आघाडी ) प्रणव बोबडे,माजी जिल्हा अध्यक्ष ( युवक आघाडी ) . सुजित तेलगोटे व समस्त महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटना जिल्हा अकोला
0 टिप्पण्या