माजी उपसरपंच यांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी सोडवीले उपोषण
पातूर तालुका प्रतिनिधि गुलाब भाऊ अंभोरे
माजी उपसरपंच यांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते तहसिल कार्यालयावरील सुरू असलेले आमरण उपोषण लवकरच काम पूर्ण होण्याचे आश्वासन देऊन सोडवीण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, तालुका अध्यक्ष डॉक्टर धर्माळ, गवई, गणेश उत्तम इंगळे विवरा, हरिभाऊ इंगोले विवरा प्रदीप अंभोरे तसेच दिलिप कीरतकार , शरद सुरवाडे, एडोकेट बोरकर, तसेच पत्रकर गुलाब भाऊ अंभोरे उपस्थित होते.
अकोला तहसिल कार्यालय अंतर्गत येत असलेल्या पातूर तालुक्यातील गाव विवरा येथील भूमिहीन शेतमजूर यांनी आमरण ( अन्नत्याग) उपोषण १३ ऑगस्ट पासुन सुरु केले आहे. १९८८ पासुन शासनाची ई-क्लास जमिनीवर आपल्या पोटाची खळगी भरीत आहेत. दरवर्षी तहसिल कार्यालय अंतर्गत पावत्या भरणा करीत आहेत. सन १९९४ मध्ये कारागृहातील दंडाच्या पावत्या सुध्दा उपलब्ध आहेत. सन १९९२ मध्ये ग्रामपंचायत विवरा सरपंच भैया साहेब देशमुख यांनी ठराव दिला प्रमाने यांना जमीन देण्यात आल्या. यांचा संघर्ष ३५ वर्षा पासून सुरु असुन भुकेल्या ना जेवण द्या, बेघर लोकांना घर दया, या शासनाच्या ब्रीदवाक्याचा विरोधाभास होत आहे. सदर उपोषणाला मोतीराम नारुजी किरतकार, भीमराव डोमाजी अंभोरे, अशोक काशिराम किरातकार, भास्कर डोमाजी अंभोरे आदी गावकरी असून शेत जमिनीचे पट्टे त्यांच्या नावे झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आज माजी उपसरपंच यांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते तहसिल कार्यालयावरील सुरू असलेले आमरण उपोषण लवकरच काम पूर्ण होण्याचे आश्वासन देऊन सोडवीण्यात आले.
बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


0 टिप्पण्या