पश्चिम बंगालमध्ये डॉक्टर मुली वर सामूहिक बलात्कार करून अतिशय क्रूरपण झालेल्या हत्येचा च्या बाबत निषेध मोर्चा
पातूर :
कोलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील 31 वर्षीय डॉक्टर मुलीवर बलात्कार करून दिली हत्या करण्यात करण्यात आलीआहे.
उच्च न्यायालयाने हा प्रकरण सीबीआय कडे देण्याचे आदेश दिल्यावर TMC च्या कार्यकर्त्यांनी बलात्कार झालेल्या ठिकाणाचे तोडफोड करून पुरावे नष्ट करण्यात आले.
महिला मुख्यमंत्री असलेल्या पश्चिम बंगालमध्ये सामान्य महिला सुरक्षित नाहीत,तिथे वारंवार अशा बलात्काराचे प्रकरण घडत आहेत आणि तिथलं सरकार प्रकरण दाबून आरोपींना पाठीशी घालत आहे.
याचा निषेध करण्यासाठी आदरणीय सौ.सुहासिनीताई धोत्रे, सौ.मंजुषाताई सावरकर,सौ. समीक्षा ताई धोत्रे,सीमाताई मांगटे पाटील व सौ.वैशाली निकम महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, यांच्या सूचनेनुसार
या अतिशय गंभीर अत्याचारा विरोधात शुक्रवार दि.16 ऑगस्ट 24 ला प्रत्येक जिल्ह्यात संध्याकाळी मेणबत्ती घेऊन "सायलेंट कॅन्डल मार्च" काढला गेला. पातुर येथेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात या गंभीर प्रकरणाचा महिला आघाडी कडून निषेध करण्यात आला.
सविस्तर वृत्त येथे👆 पहावे
कार्यक्रमाला सौ.वैशाली निकम,नंदा काळे,शीला आवटे,माधुरी ढोणे,वैशाली पेंढारकर,प्रीती देवकर,संगीता ढोणे,जयश्री गोरे,सखुबाई पेंढारकर,अनिता देवकर, शांताबाई बगळेकर,सविता डोंगे, सुशीला तरंगडे,सुशीला भाजीवाले,वर्षा माकोडे, विशाखा जावळे,सुनीता बोळे, शारदा इंगळे,शोभा माकोडे इत्यादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या