Ticker

6/recent/ticker-posts

मुर्तीजापुर तालुक्यातील जीतापूर खेडकर येथे नाल्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू

मुर्तीजापुर तालुक्यातील जीतापूर खेडकर येथे नाल्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू


पाहण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी


मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी- संतोष माने

मुर्तीजापुर तालुक्यातील जीतापूर खेडकर येथे नाल्यात दोन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना 14 ऑगस्ट रोजी पाच वाजताच्या दरम्यान घडली आहे
मिळालेल्या माहितीनुसार हीरपूर येथे राहणारे शेख आयान शेख अजीज वय 17 वर्ष व मोहम्मद अमीर मोहम्मद मुजम्मिल वय 14 वर्षे हे दोन मित्र हिरपूर वरून बाजूच्या जीतापूर खेडकर येथे असलेल्या नाल्यात आंघोळीसाठी गेले परंतु मुर्तीजापुरात सतत पाऊस सुरू असल्यामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे पाण्याचा प्रभाव वाढलेला होता आणि खोलीकरण असल्यामुळे या मध्ये शेख आयान व मोहम्मद अमीर या दोन बालकांचा मृत्यू झालेला आहे गावकऱ्यांच्या मदतीने या दोन बालकांना पाण्यातून बाहेर काढले व ताबडतोब लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय येथे आणले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केले नातेवाईकांनी व इतर मित्र परिवारांनी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली संपूर्ण परिसरात ही घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे मृतकाच्या परिवाराला या रुग्णालयातील रवी राठी,सम्राट डोंगरदिवे ,संजय नाईक ,मो सोनु ,मो शाहबोद्दीन ,आसीफ खान यांनी सातवाहन भेट दिली व त्यांच्या दुःखात सहभागी झाले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या