बोगस मतदार यादीतून कमी करण्यात यावे - आ. रणधीर सावरकर
अकोला
अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघामध्ये 14 हजार पेक्षा जास्त मतं बोगस असून त्याची चौकशी करण्यात यावी व ते मतदार यादीतून कमी करण्यात यावे अशी मागणी आमदार रणधीर सावरकर व पश्चिम विधानसभा प्रमुख माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती भालेराव यांची भेट घेऊन मागणी केली आहे
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये तसेच आजूबाजूच्या परिसरातील 14 हजार पेक्षा जास्त मते विशिष्ट समाजातील नागरिकांची असून ते कमी करण्यात यावी. अनेक पुरावासह आज भारतीय जनता पक्षाने अकोला पश्चिम मध्ये विशिष्ट भागामध्ये राजकीय पक्षाचे बूथ प्रमुख नसतात त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर गडबड होत असते याकडे लक्ष वेधून त्या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व ती नावे कमी करण्यात यावी यासंदर्भातलं पत्र जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक आयोग तसेच राष्ट्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे शहरातील अकोट फाईल खदान तसेच मध्य भागातील अनेक मतदान केंद्रावर असलेला घोळ लक्षात आणून देण्यात आला आहे या संदर्भात विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज भेट घेतली यामध्ये माजी नगराध्यक्ष, ,हरीश अलीम चंदानी संजय बडोणे , ,सागर शेगोकर ,संजय बढ़ोने,संजय गोट फोड़े,अजय शर्मा ,संतोष पांडे,पवन महल्ले रंजीत खेडकर,,मनोज साहू ,तुषार भिरड,सौ, चंदा ठाकुर ,सौ कल्पनागोट फोड़े ,विक्की ठाकुर,अतुल अग्रवाल ,संदीप अलीम चंदानी,राहुल मुरारका, दीपिका ठाकुर . हरिभाऊ काळे, रमेश करीहार राजेश चौधरी रुपेश यादव, नितीन राऊत, टोनी जयराज, प्रवीण झापडे,, कैलास रणपिसे वसंत संदलकर.. रामदास सरोदे संजय अग्रवाल संजय जोशी आदींचा समावेश होता.
0 टिप्पण्या