शिवरायांचा पुतळा कोसळला.. अकोल्यात शिवसैनिकांनी काय केले पहा...
अरबी समुद्रातील शिवस्मारकाची एकही वीट न रचता करोडो रुपये खाणाऱ्यांनी आज शिवरायांचा पुतळा उभारताना पण भ्रष्टाचाराची माती खाल्ली. पंतप्रधान मोदी उद्घाटनाला येणार म्हणून पुतळा घाईघाईने बनवला का? महायुतीने आज पुन्हा एकदा शिवरायांचा अवमान केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना अतिशय वेदनादायी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अकोला शहराच्या वतीने आज मंगळवार दुपारी ४:३० वाजता गांधी चौक येथे निषेध कारणात आला. शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या