Ticker

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वृद्धापकाळात आधार देणारी- आ. रणधीर सावरकर

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही वृद्धापकाळात आधार देणारीआ. रणधीर सावरकर 


चोहोटा येथिल शिबिरात 1500 लाभार्थ्यांचे अर्ज स्वीकृत


राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना स्वतःच्या आवश्यक गरजा पुर्ण करण्यासाठी आधार मिळावा या सकारात्मक दृष्टीकोनातून राज्य सरकारने मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचा अभिनंदनिय निर्णय घेतला असून ही योजना वयोवृद्ध नागरिकांसाठी खरा आधार देणारी असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार जनहिताच्या कितीतरी योजना राबवित आहे. या योजणांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावा यासाठी प्रशासनाने सर्वपरी प्रयत्न करावे असे निर्देश सुद्धा आमदार सावरकर यांनी दिले आहेत.  तसेच आमदार सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्वकांशी योजनेचा लाभ जास्तीत नागरिकांपर्यंत पोहचावा यासाठी भाजपच्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेतला असून ग्रामीण भागात जनजागृती सुरु केली आहे. त्यामध्यमातून  सोमवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी चोहोटा येथिल ग्रामसचिवालय येथे भव्य शिबिराचे आयोजन केले होते.


या शिबिरात 1500 वयोवृद्ध नागरिकांचे अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.  जास्तीत जास्त वयोवृद्ध नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून जनजागृतीचे अभियान सुरूच ठेवावे असे आवाहन आमदार सावरकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या