Ticker

6/recent/ticker-posts

आमदार रणधीर सावरकर यांच्या सन्मानार्थ " लाडक्या बहिणी " एकवटल्या शासनाच्या योजनेने दिला खरा आधार

आमदार रणधीर सावरकर यांच्या सन्मानार्थ " लाडक्या बहिणी " एकवटल्या शासनाच्या योजनेने दिला खरा आधार


रेल येथिल कार्यक्रमात महिलांनी व्यक्त केल्या भावना
 

अकोट तालुक्यातील रेल येथे रेलेश्वर संस्थानच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमा दरम्यान आमदार रणधीर सावरकर यांच्या सन्मानासाठी "लाडक्या बहिणींनी" मोठ्या प्रमानात गर्दी केली होती. यावेळी त्यांचा शॉल श्रीफळ देऊन सत्कार करत राज्य शासनाच्या "लाडकी बहीण " या योजनेमुळे गोरगरीब कुटुंबातील महिलांना खरा आधार मिळाला असल्याच्या भावना उपस्थित असंख्य महिलांनी आमदार सावरकर यांच्या समोर व्यक्त केल्या.

 राज्य शासनाने लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर सुरवातीला या योजनेत अनेक नियम लावन्यात आले होते. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजूळव करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याची स्थित्ती निर्माण झाली होती ह्या अडचणी लक्षात घेत. अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचीटणीस रणधीर सावरकर यांनी या योजनेतील नियम व अटी शिथिल करून महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी तातकाळ उपाययोजना करून त्याची अंमलबजवणी करन्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, अजिददादा पवार यांच्याकडे केली होती. 


त्यानंतर राज्यातील सर्वच बहिणींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महायुतीच्या सरकारने सर्वच नियम व अटी रद्द करण्याचा निर्णय घेतला. शासनाच्या या निर्णयानंतर आज राज्यातील करोडो बहिणींना या योजनेचा लाभ घेता आला आहे.  याकरिता आमदार रणधीर सावरकर यांचे महिलांनी आभार व्यक्त करत त्यांना राख्या बांधून बहीण भावाच्या नात्याप्रती आपुलकी व्यक्त केली. यावेळी राजूभाऊ नागमते,संतोष भाऊ शिवरकार उपसभापती , विनोद मंगळे, दादाराव भाऊ पेटे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,मधुभाऊ पाटकर, पिंटू महाले, पवन वर्मा, मनीष मोडक, शुभम लोणे सरचिटणीस, मोहन कपले, मोहन घुगरे, सुनील बेलूरकर, अक्षय भाऊ ढोरे, प्रेम खडसे, राहुल लिंगोट, जयंत मोरे, अनिकेत काळे, अभिषेक घुगरे, शुभम कोल्हे, चेतन रायबोले, यांच्यासह सरपंच वर्षा वानखडे, उपसरपंच माधुरी धमके, मीरा बाई मेहनकार, मंगला काकू झाडे, संगीता ताई लोणे, शीतल कपले, मा. जी प सदस्या कोमलताई पेटे, शारदा बाई सांगोर कार,हर्षाताई मिसाळे,शीतल लोणे, वैशाली लोणे, कांचन लोणे,दुर्गा बाई ठाकरे सह महिला वर्ग उपस्थित होत्या.



बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या