NEET मधे अकोला राज्यात सातवे, १० विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने केंद्र आणि शहरांनुसार NEET UG च्या गुणांची यादी ऑनलाइन जारी केली आहेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या 'नीट-यूजी' परीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून केंद्रनिहाय आणि शहरनिहाय विद्यार्थ्यांचे मार्क जारी करण्यात आले आहे. या अकोला जिल्ह्यातील १० विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण तर सुमारे ८६१ विद्यार्थ्यांना ५०० प्लस गुण मिळाले आहेत.
यंदा NEET परीक्षेत मोठा बदल झाला आहे. यापूर्वी फक्त मोठ्या कोचिंग हबमधील विद्यार्थी टॉप करायचे, पण या वर्षी देशभरातल्या 1404 केंद्रांमधून (276 शहरे आणि 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये) एकूण 2321 विद्यार्थ्यांनी 700+ गुण मिळवले आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, आता छोट्या शहरांतील विद्यार्थीही मेहनत घेऊन मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत आहेत.
लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी केले टॉपहे खरंय की, कोटा, सीकर आणि कोट्टायम सारख्या प्रसिद्ध कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, परंतु इतर सेंटरमधील विद्यार्थीदेखील चमकले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल लागल्यामुळे, संपूर्ण देशातील हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.
0 टिप्पण्या