गुरु पौर्णिमेच्या शुभ पावन पर्वावर श्रीक्षेत्र शेगाव येथे महाप्रसाद
मूर्तिजापूर
प्रतिनिधी - संतोष माने
गुरु पौर्णिमेच्या शुभ पावन पर्वावर श्रीक्षेत्र शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या महाप्रसादाकरिता दरवर्षी मूर्तिजापूर येथून अन्नधान्य पाठविण्यात येत असते . उद्या गुरुपौर्णिमा आहे .वेळ कमी आहे . अजूनही काही भक्तांची अन्नधान्य पाठवण्याची इच्छा राहिली असेल तर आपण कृपया सकाळी ८ वाजेपर्यंत आपले अन्नधान्य पोहोच करू शकता .किंवा त्या ऐवजी रोख रक्कम फोन पे द्वारे पाठवू शकता .अशी संधी पुन्हा कधी येत नसते .
अन्नदान सर्वश्रेष्ठ दान आहे जमा केलेले अन्न धान्य मुर्तीजापुर येथून श्रीक्षेत्र शेगाव संस्थान मध्ये महाप्रसादाकरिता पोचविण्याकरता जळमकर इंडस्ट्रीज नगर परिषद समोर मुर्तीजापुर येथून गाडी निघत आहे .सर्वप्रथम अन्नधान्याची पूजा अर्चा करून आरती होईल . नंतर गाडीचे प्रस्थान होईल या कार्यक्रमाकरिता जर आपणास उपस्थिती लावायची असेल तर कृपया आपण सकाळी ८ वाजता जळमकर इंडस्ट्रीज मुर्तीजापुर येथे उपस्थित रहावे .तसेच ज्या सदभक्तांची शेगाव येथे अन्नधान्या सोबत येण्याची इच्छा असेल ते कृपया शेगाव येथे आपल्या स्वखर्चाने , स्वतःच्या सोयीने उपस्थित राहू शकता .त्यांना तेथे संस्थानचे अन्नधान्य व्यवस्था व नियोजन पाहण्याकरिता मिळणार आहे .



0 टिप्पण्या