Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी बोटांनी भेंडी, कांदा ,बटाटा तसेच प्राणी व पक्षाची तयार केलीत मुखवटे

विद्यार्थ्यांनी बोटांनी भेंडी, कांदा ,बटाटा तसेच प्राणी व पक्षाची तयार केलीत  मुखवटे 

 मुर्तीजापुर 
 प्रतिनिधी- संतोष माने 
आज जि.प.शाळा सालतवाडा येथे शासनाच्या आदेशाने शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस मोठा हर्षो उल्हासाने साजरा झाला करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सावळे सर,शिक्षक सारसेसर ,राऊत सर शाळा समिती अध्यक्ष करिश्माताई शिराळे,सदस्य रेखाताई नागे ,गजानन चव्हाण व पालक वर्ग सुजाताताई भटकर,मंगलाताई गांवडे,ज्योतीताई अरज,उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्य पेटी मधुन साहित्य निर्माण केले त्या मध्ये वर्ग पहीली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी बोटांचे,भेंडी कांदा ,बटाटा ईत्यादिंचे ठसे चित्र काम केले,चौथी पाचवीच्या विद्यार्थ्यांनी प्राणी व पक्षाची मुखवटे तयार केली त्याच प्रमाणे सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी कागदाच्या टोप्या ,कापडाच्या बाहुल्या, लाडाचा मोबाईल, पुठ्ठया पासुन क्रिकेट खेळणारे मुले तयार केली, या उपक्रमासाठी बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होता.

         सविस्तर वृत्त येथे पहावे 

बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या