Ticker

6/recent/ticker-posts

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा 


अकोला 
सातत्याने सत्तेत राहत राहून सुद्धा लोकप्रतिनिधी असताना सुद्धा जननेता असताना सुद्धा आपला वाढदिवस सेवा प्रकल्प म्हणून साजरा करावा कोणतीही उपरी देखावा न करता प्रत्यक्षात जनतेला लाभ पोहोचेल असे कार्य करा असा महाराष्ट्राचा एकमेव नेता राज्याची उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस असून जनतेला समर्पित सेवा दिन म्हणून साजरा करा यासाठी कोणतेही वाजागाजा न करता सामाजिक दायित्व म्हणून कर्तव्याची भावना जागृत करणाऱ्या लोकनेते देवेंद्रजी फडणवीस यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच सदिच्छा म्हणून आज अकोला जिल्ह्यात 22 सेवा प्रकल्प च्या माध्यमातून वाढदिवस साजरा करण्याचा उपक्रम अभिनंदन असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले. 


स्थानिक मनुताई कन्या शाळा येथे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांची वाढदिवस उचित साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्री, ड्रेस, रजिस्टर बुक लेटर वाटप कार्यक्रमात ते बोल तहोते
लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण, चेष्टांसाठी वयोश्री योजना ज्येष्ठांसाठी तीर्थ यात्रा योजना युवकांसाठी विकास योजना सहा हजार ते दहा हजार रुपये मदत महिलांना मोफत बस सेवा सुरू करणारा शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणारा लोकनेता पंचामृत च्या माध्यमातून विकासाचा संकल्प घेऊन जलशिवार युक्त योजना व मूलभूत सुविधा उभारणी करणारा लोकनेता देवेंद्र फडणवीस आपला वाढदिवस सत्तेत असताना साजरा न करता सामाजिक व समाजाच्या शेवटच्या घटकाची सेवा करण्याचा पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्मता मानवतावाद व घटना शिल्प बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने हिंदुत्व व राष्ट्रीयत्व विचारसरणीने काम करण्याच्या संकल्प घेऊन कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस साजरा करण्याचा आदेश सातत्याने देणारा महाराष्ट्राचा एकमेव नेता असल्याचीही आमदार सावरकर यांनी सांगीतले.


 अकोला महानगरात राजेश्वराला त्यांना दीर्घायुष्य लाभो म्हणून अभिषेक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने हा अभियानाचा शुभारंभ तसेच विविध ठिकाणी फळ वाटप वेगवेगळ्या बावीस ठिकाणी आज कार्यक्रम घेऊन नामदार फडणवीस यांचा वाढदिवस भाजपातर्फे साजरा करण्यात आला माजी खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मा.प्रदेश सरचिटणीस , आमदार रणधीरभाऊ सावरकर, खासदार श्री अनुपभाऊ धोत्रे आमदार . वसंतभाऊ खंडेलवाल, जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ मांगटे पाटील, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, . विजयभाऊ अग्रवाल, कृष्णाभाऊ शर्मा, गिरीश जोशी, माधव मानकर, संजय गोटफोडे, रमेश करिहार, प्रशांत अवचार, सौ. चंदा शर्मा, सौ अश्विनी उजवने अश्विनीताई हात वळणे, दिलीप नायसे, बबलू पळसपगार सुनील बाठे , हेमंत शर्मा यश अग्रवाल राहुल मुरारकर नितेश पाली, अतुल गोमासे सारिका जयस्वाल, कपिल बुंदेले, राजेश चौधरी, सचिन आयवडे, सौ सुषमा शुक्ला सौ गायत्री शुक्ला दिलीप नायासे सागर शेगोकार, विजय इंगळे अजय शर्मा पुरोषत्तम पानझडे, संजय झाडोकर, निलेश पाली हेमंत सतवाले संध्याताई लोहकपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अकोला 
२२ जुलै, १९७० रोजी नागपूर येथे जन्म घेतलेले देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाला पडलेले एक सुंदर स्वप्नच म्हणावे लागेल;
विद्यार्थीदशेत असतानांच महाविद्यालयीन राजकारणात तावूनसुलाखून निघालेले फडणवीस, वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी नागपूर शहराचे महापौर झाले. 
 देवेंद्रजी वयाच्या २९ व्या वर्षांपासून म्हणजेच १९९९ पासून ते आजतागायत नागपूर शहरातून विधानसभेवर सलग निवडून येतात. 
१९९९ आणि २००४ ला ते नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात,  तर, २००९ पासून नागपूर दक्षिण - पश्चिम मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात.
त्यानंतर ,भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि नंतर २०१४ ते २०१९ च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी उत्कृष्ट कार्यभार पाहतात असा नेतृत्व आम्हाला लाभला आहे त्यांचा वाढदिवस सेवा कार्याला समर्पित असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर  सावरकर यांनी केलेभाजपा अकोला तालुक्याच्या वतीने सेवा कार्यक्रमात निमित्त आयोजित कार्यक्रमाचे बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवेंद्र देवर हे होते तर मंचावर अंबादास उमाळे तेजराव थोरात पंकज वाडी वाले हिम्मत देशमुख डॉक्टर शंकरराव वाकोडे राजेश बेले माधव मानकर अमित कावरे संदीप गावंडे प्रशांत आवचार मिलिंद राऊत आधी प्रामुख्याने उपस्थित होते. 
मुख्यमंत्री पदाच्या काळात शासकीय अनुदान आणि इतर योजनांना आधार कार्डशी सुसंगत करणारे, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस धावून जाणारे एक आगळे - वेगळे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याने देवेंद्रजीच्या रूपात पाहिले आहेत.

कोणताही अभिनिवेश न बाळगता जनसामान्यांमध्ये सहजतेने वावरणारे, पोलीस शिपायांना वारंवार सॅल्युट न करण्याबद्दल सुचित करणारे, हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावल्यानंतर न डगमगता आपले कर्तव्य पुढे नेणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी कायमस्वरूपी स्मरणात राहतील. अशीही सावरकर यांनी याप्रसंगी सांगितले.

डिसेंबर २०१९ ते 
जून २०२२ च्या दरम्यान महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांची कारकीर्द कौतुकास्पदच होय. निर्भीडपणे सत्ताधारी पक्षाचे वाभाडे काढणारा असा विरोधी पक्षनेता भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये विरळाच! आणि यासाठी आम्हाला सार्थ अभिमान असल्याचीही सावरकर यांनी सांगून दीर्घायुष्याची कामना केली.

" माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे होर्डिंग कोणत्याही शहरांमध्ये- गावांमध्ये लावण्यात येऊ नये", अशी नम्र सूचना करणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज २२ जुलै रोजी वाढदिवस! 

महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या हृदयावर ते विराजमान झाले आहेत.
 त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो, हीच श्री गणपतीच्या चरणी प्रार्थना! अशा स्वरूपात आमदार सावरकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे संचलन एडवोकेट देवाशिष काकड तर प्रास्ताविक प्रवीण हगवणे यांनी तर आभार प्रदर्शन गोपाल मुळे यांनी केले


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या