Ticker

6/recent/ticker-posts

अकोलेकरांनो हवाई प्रवासासाठी व्हा सज्ज; १९ आसनी विमान सेवा सूरू....?

अकोलेकरांनो हवाई प्रवासासाठी व्हा सज्ज; १९ आसनी विमान सेवा सूरू....?


अकोला : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत शहरातील शिवणी विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवणीवरून सात मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे खासदार अनुप धोत्रे यांनी सादर केला. त्या प्रस्तावावर विमान कंपन्यांकडून देखील चाचपणी केली जात आहे. मोदी सरकार तीनमध्ये उडान योजनेंतर्गत विमान कंपन्यांसोबत नव्याने करार झाल्यावर शिवणीवरून १९ आसनी विमानाची सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. माजी खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री. आदरणीय संजय भाऊ धोत्रे, विद्यमान, खासदार अनुप संजय भाऊ धोत्रे, यांनी, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून अकोल्यात विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा याकरिता माननीय खासदार अनुप संजय धोत्रे साहेब. आमदार रणधीर भाऊ सावरकर साहेब.  आमदार हरीश भाऊ पिंपळे साहेब, आमदार प्रकाश पाटील भारसाकळे साहेब.  आमदार वसंत बाबू खंडेलवाल साहेब.  सर्व लोकप्रतिनिधींचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या