Ticker

6/recent/ticker-posts

शाळा स्तरावरील उपक्रम यशस्वी करा- अनिता तेलंग

शाळा स्तरावरील उपक्रम यशस्वी करा- अनिता तेलंग 


अतिसार थांबवा मोहीम: केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांना मार्गदर्शन


अकोला: दि. 18 जुलै - अतिसार थांबा मोहिमेमध्ये शाळा स्तरावरील उपक्रमामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून अतिसार मोहिमेबद्दलची जनजागृतीची व्याप्ती वाढवावी व हे उपक्रम यशस्वी करावेत असे आवाहन जलजीवन मिशनच्या प्रकल्प संचालक अनिता तेलंग यांनी मंगळवारी आयोजित कार्यशाळेमध्ये केले. अकोला तालुक्यातील केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक उपस्थित असलेल्या या कार्यशाळेचे आयोजन अकोला पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत होली क्रॉस कॉन्व्हेंट च्या सभागृहामध्ये करण्यात आले होते. या कार्यशाळेला डायटच्या प्राचार्य डॉ. रत्नमाला खडके, गटशिक्षणाधिकारी श्री श्याम राऊत, विस्तार अधिकारी शिक्षण दीपमाला भटकर यांची उपस्थिती होती. या कार्यशाळेला अकोला तालुक्यातील 18 केंद्र शाळेचे केंद्रप्रमुख व तालुक्यातील 540 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. याच कार्यशाळेमध्ये सलाम बॉम्बे फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने तंबाखू मुक्तीसाठी च्या उपाययोजनांवर सादरीकरण करण्यात आले व माहिती देण्यात आली. सध्या जिल्ह्यामध्ये अतिसार थांबवा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्याच्या निबंध स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा तसेच विद्यार्थ्यांची रॅली, विद्यार्थ्यांच्या सहभागातून पथनाट्य आदी उपक्रम आयोजित करायचे आहे . गाव स्तरावरील उपक्रमांमध्ये शाळा व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे सहभाग मिळावा म्हणून शिक्षकांकडून जनजागृती करण्यात यावी अशी सूचना सुद्धा यावेळी प्रकल्प संचालक अनिता तेलंग यांनी केली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या