पेन्शन, मानधन/वेतन वाढ करा अन्यथा मुखमंत्री, उपमुख्यमंत्री महिला व बालकल्याण मंत्री आमदार खासदार यांना घेराव आंदोलन करणार.!
अकोला
कॉम्रेड अण्णाभाऊ साठे स्मृती दिनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन, मानधन/वेतन वाढ व इतर प्रलंबित मागण्यांबाबत शासन व प्रशासन गेली २ वर्षे फक्त विचार व विचारणा करत आहे. परंतु समाधानकारक मानधन वाढीसहित अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. ५२ दिवसाच्या संपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शनसह भरघोस मानधन वाढ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु अद्याप पर्यंत आदेशाची अंमलबजावणी न केल्याने या मुर्दाड शासनाच्या विरोधात ५२ दिवसाचा प्रदीर्घ संप करूनही शासन हललेले नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकले आहे की महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महिला बालकल्याण मंत्री या फक्त खोकले आश्वासन देत आहेत जर त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आशोधनाची पूर्तता केली नाही त्यामुळे या मुर्दाड शासन, प्रशासना विरोधात आज आंदोलन तीव्र करण्यात आले. या आंदोलनाद्वारे शासनाला इशारा देण्यात येत आहे की जर शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन मानधन वाढ व इतर प्रलंबित प्रश्न बाबत येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय न घेतल्यास राज्यातील समस्त अडीच लाख अंगणवाडी कर्मचारी मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या घरावर महिला व बालकल्याण मंत्री यांच्या घरावर उपमुख्यमंत्री यांच्या घरावर कार्यालयावर जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या आंदोलन करतील करिता शासनाला नम्र विनंती की त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे पेन्शन मानधन वाढ व इतर प्रलंबित प्रश्न त्वरित सोडवावे.!
अंगणवाडी कर्मचारी फक्त अंगणवाडी मुलांना शिक्षण व आहार तसेच आरोग्य विषयी काम करतील व आज पासून अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहीण योजनेचे काम ही करणार नाही जोपर्यंत शासन प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबत तोडगा काढत नाही तोपर्यंत सर्व योजना वर काम बंद करून, मासिक अहवाल, शासकीय बैठका व योजना, सीबीई आदी कार्यक्रमांवर बहिष्कार घालून शासनाच्या विरोधात असहकार पुकारत आहे. आंदोलनात कॉ. रमेश गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष राज्य मार्गदर्शक जिल्हा अध्यक्षा राज्य सचिव कॉ. सुनीता पाटिल राज्य संगठक व जिल्हा सचिव कॉ. नयन गायकवाड विनित कॉ. सुरेखा ठोसर कॉ. दुर्गा देशमुख, कॉ. सरोज मुर्तिजापूर कॉ. ज्योती ताथोड सहसचिव, कॉ. महानंदा ढोक, कॉ. सुनंदा पदमने, कॉ. आशा मदने कॉ. मंगला अढावु, कॉ. त्रिवेणी मानवटकर, कॉ. कल्पना महल्ले, कॉ. वंदना डांगे, कॉ. मंगला मांजरे हजारो अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. असे कॉ. सुमित गायकवाड आपल्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळवीत आहे.!
सविस्तवृत्त येथे 👆 पहावे..



0 टिप्पण्या