Ticker

6/recent/ticker-posts

डाबकी रोड वरील अनधिकृत मास विक्रेते हटवा मातोश्री प्रतिष्ठान चे योगेश ढोरे यांचा इशारा

डाबकी रोड वरील अनधिकृत मास विक्रेते हटवा मातोश्री प्रतिष्ठान चे योगेश ढोरे यांचा इशारा


अकोला-डाबकी रोड वरील अनधिकृत चिकन,मटन ( मास ) विक्रेतांनचे अतिक्रमण हटवण्याबाबत आज मातोश्री प्रतिष्ठान तर्फे निवेदन दिले. डाबकी रोड राजकमल हॉटेल ते रेल्वे गेट पर्यंत हा रस्ता गणपती मंदिर गायगाव व श्री संत गजानन महाराज शेगाव या तीर्थक्षेत्रांकडे जाणारा रस्ता आहे या रस्त्याने लोक सकाळ आणि संध्याकाळ महिला व वयोवृद्ध लोक मॉर्निंग वॉक साठी जात असतात. आणि हा परिसर सामाजिक व सांप्रदायिक लोकांनी वसलेला आहे राजकमल हॉटेल पासून ते रेल्वे गेट पर्यंत काही मास विक्रेत्यांनी आपले अनधिकृत दुकान थाटून बसलेले आहेत. या मासिक्रेत्यांमुळे या परिसरात खूप दुर्गंधी होत आहे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे गजानन नगर,सरस्वती नगर, लक्ष्मी नगर, अंबिका नगर, सिद्धिविनायक,कॉलनी, पोलीस वसाहत,आश्रय नगर, गुरुदत्त नगर,बालाजी नगर या सर्वांनी मिळून महानगर पालिका आयुक्त यांना विनंती केली की हा रस्त्या आम्हाला मोकळा करून देण्यात यावा अन्यथा आम्ही आमच्या परीने हे अनधिकृत मास विक्रेते हटवू याची सर्वांस्वी जबाबदारी प्रशासना ची राहील असा इशारा देण्यात आला निवेदनाच्या प्रतिलिपी क्षेत्रीय अधिकारी पश्चिम झोन व पोलीस स्टेशन डाबकी रोड यांना देण्यात आल्या . निवेदन मातोश्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष 
 योगेश ढोरे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. 


निवेदन देत्यावेळी ऍड अमर भैया तिवारी, गजानन गोलाईत, कुशल जैन, ऍड हेमंत सपाटे,अनुपम सोळंके,पंकज बाजोळ, हरीश बोंडे, मयूर मिश्रा, विक्की साबळे यांच्या सह डाबकी रोड परिसरातील नागरिक उपस्थित होते..


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या