Ticker

6/recent/ticker-posts

जिल्ह्यात ३० जूलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस

जिल्ह्यात ३० जूलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस 


अकोला
नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने अकोला जिल्ह्यात ३० जूलैपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्‍याची शक्‍यता वर्तवली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये जलसाठा वाढत असून पुरस्थ‍ितीचा अनुषंगाने ज‍िल्ह्यातील नागर‍िकांनी नदी - नाल्यामध्ये पोहण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केलंय..
तर पुरस्थ‍ितीत पुर पाहण्यासाठी नदी -नाला काठावर जाऊ नये , विज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्‍यात यावा आणि अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये त्याचप्रमाणे पुरस्थ‍ितीत पुलावरून पाणी वाहत असतांना पुल, रस्ता ओलांडू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या