Ticker

6/recent/ticker-posts

भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्याची मागणी

भ्रष्टाचारी ग्रामसेवकाची तात्काळ बदली करण्याची मागणी 


पातूर तालुका प्रतिनिधी - गुलाब भाऊ अंभोरे


जिल्हा अकोला पंचायत समिती पातूर अंतर्गत येत असलेले ग्राम विवरा या गावामध्ये आज जवळ पास अंदाजे ९ ते १० वर्ष पासुन ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेला ग्रामपंचायत विवरा येथे ग्राम सेवक पंजाब पंढरी चव्हांन हा कार्यरत आहे. परंतु ९ ते १० वर्ष कर्मचारी एकाच गावात राहू शकतो का असा प्रश्न गावातील गावातील नागरिकांना पडला आहे. नुकतीच केलेली तक्रार ग्राम पंचायत विवरा येथील हल्ली असलेले उप सरपंच प्रदीप अंभोरे यांनी सीईओ मेडोम जिल्हा परिषद अकोला येथे तक्रार दिली त्या तक्रार मध्ये ग्राम सेवक पंजाब चव्हांन वर घन घणीत भ्रष्टाचार चे आरोप केलेले आहेत. शासनाचा नारा आहे झाडे लावा झाडे जगवा. शासन या मध्ये खूप पैसा खर्च करतो. परंतु ग्रामसेवक पंजाब चव्हांन याने २०२१ पासुन एकही झाड लावलेलं दिसत नाही. शासनाची पूर्ण योजना कुठे जातात, अशी सीईओ  यांच्याकडे तक्रार करून मोक्का पाहणी करण्याची मागणी केली आहे. गावातील कचरा पेटी घन कचरा, कुंड्या, गाव स्वच्छ रहावे म्हणून प्रत्येक गावा गावात हि योजना सुरु आहे परंतु विवरा गावात या योजनेचा पत्ता नाही हि योजना स्वतः ग्रामसेवक पंजाब पंढरी चव्हांन ने हडप केलेलीं दिसते. असा गावकऱ्यांचा आरोप आहे. विवरा गावात ग्राम पंचायत सरपंच, उप सरपंच त्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे आरोप तक्रारीत केलेले आहेत. गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत ला माहितीच्या अधिकारात माहिती विचारली असता  माहिती पुरविली जात नाही व उडवाउडीची उत्तरे दिली जातात. गावातील बरीच कामे ठप्प पडलेली असुन दलीत वस्ती मधील नाली ची कामे ३ वर्षा पासून अर्धवट पडलेली आहेत. गावात ग्राम सभा अजूनही घेतली नाही.१५ आगाष्ट आणि २६ जानेवारी मध्ये शाळेतील किंवा ग्रामपंचायत वरती नागरिकांच्या सह्या घेऊन कागद पत्री कामे पुर्ण झालेली दाखविली जातात. असे घन घाणीत आरोप तक्रार मध्ये केलें आहेत. विवरा गावामध्ये घरकुल मध्ये फेरफार व मोठा भ्रष्टाचार होत असल्याची शंका आहे, अश्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.  विशेष म्हणजे २- ३ महिन्या अगोदर ग्राम सेवक पंजाब चव्हांन कार्ला ग्रामपंचायत ला असता तेथील लोकांच्या बऱ्याच तक्रारी होत्या म्हणून कार्ला ग्रामपंचायत मधून शक्य तितक्या लवकर ग्राम सेवक यांची हकाल पट्टी करण्यात आलेली दिसते. तरी विवरा येथिल सर्व नागरिकांची प्रशाशनला विनंती आहे की पंजाब चव्हांन ची तात्काळ मोका पाहणी व चौकशी करुन लवकर बदली करण्यात यावी अशी मागणी अकोला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांना निवेदनातून केली आहे. अन्यथा पंचायत समिती पातूर येथे आमरण उपोषणाचा इशारा तक्रारकर त्यांनी दिला आहे. 


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या