Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेमध्ये २ हजार ३१० उमेदवार सहभागी

पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षेमध्ये २ हजार ३१० उमेदवार सहभागी


अकोला जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सन २०२२-२३ मध्ये १९५ पोलीस शिपाई यांचे रिक्त पदांकरीता एकुण २१८५३ उमेदवारांनी ऑन लाईन आवेदन अर्ज भरले होते. त्यामध्ये १६ हजार १६१ पुरुष, ५ हजार ६९१ महीला व १ तृतीयपंथी उमेदवार यांचा समावेश होता. त्यापैकी १० हजार ६६५ पुरुष ४ हजार २५९ महीला व १ तृतीयपंथी उमेदवार असे एकुण १४ हजार ९२४ उमेदवार पोलीस भरतीकरीता उपस्थित राहीले. त्यापैकी मैदानी चाचणीत ५० टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेल्या ६ हजार २३० उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार १:१० प्रमाणात लेखी परीक्षेकरिता २ हजार ३८४ उमेदवार पात्र ठरले. आज दिनांक २५ जुलै २०२४ रोजी अकोला शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालय, देशमुख फैल, रामदास पेठ, अकोला, सिताबाई कला महाविद्यालय, पोस्ट ऑफीस रोड, सिव्हील लाईन, अकोला, एल. आर.टी. कॉमर्स कॉलेज, सिव्हील लाईन चौक, अकोला, आर. डी. जी. महिला महाविद्यालय, नेहरू पार्क चौक, अकोला या चार परीक्षा केंद्रावर संध्याकाळी लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षेकरीता एकुण २ हजार ३१० उमेदवार हजर राहीले.


लेखी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती, तसेच उमेदवारांकरीता पिण्याचे पाणी, OMR शिट वर मार्कंग करण्यासाठी बॉल पेन ईत्यादी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सदर लेखी परीक्षेकरीता मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात ०१ अपर पोलीस अधिक्षक, ०३ सहायक पोलीस अधिक्षक/पोलीस उपअधिक्षक, १९ पोलीस निरीक्षक, ६५ सहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक व ३६२ पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मा. पोलीस अधिक्षक श्री. बच्चन सिंह यांनी परीक्षा केंद्रावर स्वतः भेटी देवून बंदोबस्तावरील अधिकारी/अंमलदार यांना आवश्यक सुचना देवून मार्गदर्शन केले. सदर लेखी परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या