वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला यश, सांगळूद येथील रहिवाशी नाल्याच्या पुरात गेले होते वाहून
सांगळूद येथील नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या मृतदेहाला शोधून काढण्याची वीर भगतसिंग आपत्कालीन शोधू बचाव पथक ची यशस्वी कामगिरी.
-----------------------------------------------------
प्रतीनीधी- राहुल खाडे
अकोला -
जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीतील मौजे सांगळूद येथे झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पुर आला असून मौजे सांगळूद येथिल अंदाजे 50 वर्षीय रहिवासी राजेंद्र उत्तमराव आठवले त्यांचा पाय घसरल्याने ते नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी घडली घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पुरात वाहुन गेलेले राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा बराच वेळ शोध लागला नाही सदर घटनेची माहिती बोरगांव मंजू पोलीस स्टेशनला मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला मिळताच दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर सांगळुद येथुन वाहत गेलेला मृतदेह आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या टिम ने तीन किलोमीटर अंतरावर सांगळुद येथील राजेन्द्र उत्तमराव आठवले वय ५५ यांचा मृतदेह शोधून काढण्याची यशस्वी कामगिरी वीर भगतसिंग आपत्कालीन शोधू बचाव पथक यांनी राबवली यामध्ये पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे, उपाध्यक्ष शाहबाज शाहा, सै.माजिद,मोहन वाघमारे,शेख नजिर, प्रकाश चव्हाण,शेख मोईन , यांनी यशस्वी कामगिरी केली आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सांगळुद गावचे सरपंच रंजीत काळे , योगेश काटकर उपस्थित होते


0 टिप्पण्या