धक्कादायक! अकरावी पास असलेल्या बंगाली युवक बनला तोतया डॉक्टर
पोलिसांनी केली अटक: आरोग्य विभागाचा तपास सुरू
प्रतिनिधी निलेश इंगळे
बार्शीटाकळी - गेल्या कित्येक वर्षापासून बंगालमधील काही युवकांनी विदर्भामध्ये डॉक्टरकी पेशा सुरू केला आहे, असाच एक तोतया डॉक्टर तालुक्यातील सारकिन्ही या गावात गेल्या सहा महिन्यापासून वैद्यकीय व्यवसाय करीत होता, सोमवारी पिंजर पोलीस अचानक तोतया डॉक्टरच्या दवाखान्यात पोहोचले, पाठोपाठ वैद्यकीय अधिकाऱ्याची टीम सुद्धा दाखल झाली, सोमवारपासून ताब्यात असलेल्या तोतया डॉक्टरची मंगळवारी आरोग्य पथकाने पूर्ण छानबिन केली, तेव्हा हा तोतया डॉक्टर केवळ अकरावी पास असल्याचे निष्पन्नात निघाले आहे, त्यावेळी उपस्थित आरोग्य विभागालाही त्याचा धक्का बसला, याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र आर्या आणि त्यांची सर्व टीम चौकशी करीत आहे, पोलिसांनी तोतया डॉक्टरला अटक केली, या प्रकारामुळे बार्शी टाकी तालुक्यात खळबळ माजली आहे, त्यामुळे सर्व नागरिकांनी याबाबत अलर्ट राहून आपल्या गावात असलेल्या बंगाली डॉक्टरची चौकशी करावी आणि त्याची पोलिसांना माहिती द्यावी ,असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे,
विश्वजीत मृत्युंजय विश्वास वय 21 वर्ष ,
राहणार हैदर बेलीया, पोलीस स्टेशन हाबरा, जिल्हा बराशात (कलकत्ता) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे, प्राप्त माहिती अशी मिळाली की, एका लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाने पिंजर पोलिसांना या बोगस डॉक्टरची माहिती दिली, त्यामुळे पोलीस बोगस डॉक्टरच्या निवासस्थानी पोहोचले, ठाणेदार गंगाधर दराडे यांनी या प्रकरणाची माहिती आरोग्य विभागाला दिली, त्यानंतर मंगळवारी सकाळी सर्व आरोग्य पथकाची टीम सारकिन्ही गावात दाखल झाली, डॉक्टरची पूर्ण झाडाझडती घेतली, प्रमाणपत्राची तपासणी केली, परंतु ;तसे अधिकृत कागदपत्र काही आढळले नाही, उलट हा विश्वजीत बिश्र्वास केवळ अकरावी पास असल्याची धक्कादायक माहिती समोर आली, या तोतया डॉक्टरकडे मुदत संपलेले इंजेक्शन, गोळ्या, सलाईन, औषधी बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे आता प्रत्येक नागरिकांनी सावधानता बाळगून आपल्या जीवाशी खेळत असलेल्या अश्या बंगाली बोगस डॉक्टरला हुडकून काढावे , त्याच्याकडे असलेल्या प्रमाणपत्राची, कागदपत्राची पाहणी करावी, बोगस आढल्यास पोलिसांना आणि आरोग्य विभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे,या वेळी बार्शीटाकळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अशोक बांगर यांनी भेट देऊन माहिती घेतली,
"तोतया "डॉक्टरकडे मुदत संपलेले आढळले इंजेक्शन,आणि औषधी
मंगळवारी सकाळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रवींद्र आर्या, महान प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी किरण साबे , यांनी जेव्हा बोगस डॉक्टर कडे असलेल्या मेडिकलची तपासणी केली, त्यावेळी, मुदत संपलेलां काही औषधी साठा मिळाला, महागडे, इंजेक्शन आणि बॉम्बे मार्केट मधील डुबलीकेट औषधी साठा सुद्धा मिळाला आहे,
लोकप्रतिनिधीच्या निकटवर्तीयाने केला पोलिसांना फोन ..... अन् झाला भंडाफोड
लोकप्रतिनिधींच्या एका खास व्यक्तीने त्या बोगस डॉक्टर संदर्भात पिंजर पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी सुद्धा खास व्यक्तीचा फोन असल्याने त्या बोगस डॉक्टरचे निवासस्थान गाठले, आणि छानबिन केली, आणि आरोग्य विभागाला माहिती दिली ,पोलिसांनी कालपासून त्याच ठिकाणी ठिय्या दिला होता,
आता त्या तोतया डॉक्टरला जेलची हवा खावी लागेल, त्या खास व्यक्तीमुळे या प्रकरणाचा भंडाफोड झाला,त्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्याला धडा शिकविल्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे,
0 टिप्पण्या