व्हॉइस ऑफ मीडीया बार्शीटाकळी तर्फे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न
बार्शीटाकळी: प्रतिनिधी - निलेश इंगळे
तालुक्यातील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देवून गौरव.
सविस्तर वृत्त असे की शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ह्या कालावधीत ईयत्ता दहावी व बारावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार दि.१८ जून २०२४ मंगळवार रोजी ,बाबासाहेब धाबेकर विद्यालयाच्या सभागृहात पार पडला . यावेळी कु.जवेरीया अनम ,कु. प्रीती बाळू करांगळे ,कु. कोमल अनिल भगत ,कु.वैदेही संतोष काळे ,कु.सुमेय्या कौसर ,कु.मलिहा अनम सैय्यद मोहसीन ,कु. सना इरम अब्दुल साबीर ,कु .आरती सहदेव तायडे ,कु. नव्या रणजित जाधव,निलेश संजय वाट ,रोहन श्याम ठक ,हिमांशु बबन इंगळे नयन जाधव,ऋषिकेश चौव्हाण यांच्यासह १९ विद्यार्थांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला .या कार्यक्रमाला राजेश वझीरे(तहसीलदार ) ,आनंद गुप्ता(पुरवठा निरीक्षक) ,खुरेंद्र तिडके(वसतीगृह अधीक्षक)डॉ.सैय्यद तनवीर जमाल यांच्यासह विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते , प्रास्ताविक व सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष श्याम ठक , यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष शेख तारेकोद्दीन यांनी मानले.सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडीया बार्शीटाकळीचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले .. यामध्ये श्याम ठक , मुफीज खान ,संजय वाट ,तारेक शेख ,भावेश पटेल ,बबन इंगळे ,गुफरान शेख ,बाळकृष्ण उताणे ,विकास जाधव,श्याम कुलकर्णी,निलेश इंगळे ,मोहम्मद सुफीयान ,डॉ. मंगलदास पाटील यांचा समावेश होता. व्हॉइस ऑफ मीडियाच्या ह्या उपक्रमाचे सर्वत्रच कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे
आयपीएस व आयएएस अधिकारी होण्या बरोबरच डॉक्टर, वकील, सॉफ्टवेअर इंजिनीयर अशा विविध क्षेत्रात करिअर घडविण्याची विद्यार्थ्यांना संधी असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील जिद्द व क्षमता ओळखून त्यानुसारच करिअरचा मार्ग निश्चित करावा. बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेऊन पदवीधर होणे आवश्यक आहे तरच पुढे करिअरसाठी विविध संधी उपलब्ध असतात. जगातील विविध घडामोडी व सामान्य ज्ञानाच्या वाढीसाठी वर्तमान पत्रांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करणे गरजेचे आहे. तसेच आजच्या सोशल मीडियाचा जास्त वापर न करता सुरक्षितपणे काळजी घेणे आवश्यक आहे. व्हाइस ऑफ मीडियाने विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे केलेले आयोजन खरोखरच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
राजेश वझीरे
तहसिलदार ,बार्शीटाकळी
प्रत्येक विद्यार्थ्याच्या आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुला-मुलीने मोठे अधिकारी व्हावे. हे आई वडिलांचे स्वप्न विद्यार्थ्यांनी आपले स्वप्न बनविल्यास ते नक्कीच साकार होईल.
डॉ. सैयद तनवीर जमाल
सामान्यज्ञान कुठून अवगत करावे या भ्रमात विद्यार्थ्यांनी न पडता जगातील सर्वच घडामोडींची माहिती वृत्तपत्रांच्या माध्यमातून मिळत असते. वृत्तपत्रांमध्ये येणारे लेख, अग्रलेख व विशेष बातम्यांसह अनेक लक्षवेधी वृत्त यातून आपल्या ज्ञानात भर पडते. म्हणून दिवसाची सुरुवात विद्यार्थ्यांनी दैनंदिन वृत्तपत्राच्या वाचनाने करावी, त्यातून आपल्या सामान्य ज्ञानात भर पडते.
आनंद गुप्ता
तालुका पुरवठा अधिकारी
'व्हॉईस ऑफ मीडिया' ही पत्रकारांची संघटना, जगभरातील पत्रकार आणि पत्रकारांसाठी पाच वर्षांपासून काम करणारी संस्था आहे. आज 'व्हॉईस ऑफ मीडिया'कडे देशातच नव्हे तर जगातील नंबर वन संस्था म्हणून पाहिले जाते. आज 'व्हॉइस ऑफ मीडिया'ने जगातील 41 देशांमध्ये आपला झेंडा रोवला आहे. दीड लाख पदाधिकारी आणि दीड लाख सदस्य तसेच सहभागी पत्रकारांसह 'व्हॉइस ऑफ मीडिया'चा अजेंडा पत्रकार आणि पत्रकारितेसाठी काम करण्याचा आहे. गेल्या पाच वर्षांत व्हॉईस ऑफ मीडियाने केलेल्या कामाने सर्वत्र इतिहास रचला आहे.
श्याम ठक
तालुकाध्यक्ष
व्हॉइस ऑफ़ मीडिया
बार्शीटाकळी जि.अकोला
0 टिप्पण्या