विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडवि ण्यासाठी प्रधान्यक्रम द्या ~ प्रशांत कदम
अकोला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्ह्याचा घेतला आढावा आणि कार्यकर्त्यांना दिल्या सूचना
अकोला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्त्यांनी किती काम केले? आणि त्यांना कोणत्या अडचणी आल्या? त्या अडचणी सोडवायला काय केले पाहिजे आदी प्रमुख प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम आणि महिला विदर्भ अध्यक्ष माधुरी पालीवाल हे महाराष्ट्रात दौरा करीत आहेत. त्यानिमित्ताने आज अकोल्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने अकोल्यातील महिलांवरील अत्याचारबाबत तसेच विद्यार्थांचा कॉलेज प्रवेश, त्यांच्यासाठी वासतिगृहे आणि शिष्यवृत्ती आणि समस्या याबाबत विस्तृत विचारमंथन करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रधान्यक्रम द्या यासाठी पक्षांध्यक्ष तथा उप मुख्यमंत्री ना. अजित पवार यांचे निर्देश असल्याचे सांगत तश्या सूचना आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाश्यक्ष प्रशांत कदम यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.जिल्हा आढावा घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
अकोल्यात विद्यार्थांना भेडसावणाऱ्या समस्या बाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी धावून गेला पाहिजे. यासाठी वैभव घुगे याची अकोला शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शिवाजी शिक्षण संस्थेच्या वासतिगृहात झालेल्या गँगरेप आणि इतर अपराधीक घटनाबाबात त्यांनी उत्तरे दिली. विद्यार्थ्यांसाठी राज्यभर अभ्यास सेमिनार आयोजित केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, महिला विदर्भ अध्यक्षा माधुरी पालीवाल, महिला जिल्हाध्यक्ष रूपाली वाकोडे, प्रदेश सरचिटणीस गणेश शिंदे, सरचिटणीस सादिक खान, शहराध्यक्ष विजय देशमुख,गटनेता मनोज गायकवाड, शहर उपाध्यक्ष अक्षय बालटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
0 टिप्पण्या