एस. आर. पाटील महाविद्यालयाचे अनधिकृत बांधकाम न्यायालयाच्या आदेशाने त्वरीत पाडण्यात यावे
अकोला - स्थानिक गौरक्षण रोड या भागातील शेत स.नं.२६/२ मधील हरीष अश्विनी कॉलनी परिसरातील मुखंड क्र.५०-बी यावर यशवंत अपार्टमेंट या नावाने उभारण्यात आलेल्या इमारती मध्ये एस. आर. पाटील या नावांने महाविद्यालय या नावाची शैक्षणिक संख्या कार्यरत आहे. सदई इमारतीला निवासी उपयोगाकरिता एकूण १४१.०० चौ.मि., मनपा अधिनिस्त संचालक नगर रचना यांच्या विभागाची परवानगी असून, या उपरान्त मंजुर नकाशापेक्षा ५०३:०० चौ.मि., चे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले असुन, यामध्ये सदर संस्थेच्या वतीने महाविद्यालय कॉन्व्हेन्ट, उच्च तसेच माध्यमिक शाळा सुरू केलेली आहे.
सदर संस्थेचा शैक्षणिक डोलारा हा अकोला मनपा यांच्या नाकावर टिचुन यासह शिक्षण विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन बिनबोभाट पणे सुरू आहे. सदर इमारतीचे आजवर कोणत्याही प्रकारचे फायर ऑडिट झालेले नसून, तसेच कोणताही फायर सेफ्टी प्रोट्रोकॉल न पाळता सदर इमारत मध्ये प्रवेश करण्याकरिता एकच मार्ग असुन, तो देखील अरूंद असल्याने येथे शिक्षण घेणाऱ्या जवळपास १५०० विद्यार्थी वर्गाचा जीव धोक्यात आलेला आहे.
सविस्तर वृत्त येथे 👆 पहावे..
याकारणे गुजरात राज्यातील सुरत शहरात अलीकडच्या काळात झालेले अग्नीकांड या ठिकाणी देखील होण्याची शक्यता नकारता येत नाही, असे मत या परिसरातील अनेक लोकांनी बोलून दाखवीलेले आहे. सदर शैक्षणिक संकुलाचे संपुर्ण बांधकाम हे नियमबाहय असुन, ते त्वरीत व विना विलंब पाडण्याची लेखी सुचना/नोटीस दि.३०/०३/२०२३ रोजी अकोला मनपा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती. सदर्छु नोटीसच्या संदर्भात संस्थेच्या वतीने मा. न्यायालयात स्थगीती मागीतली होती. या प्रकरणात मा. न्यायालयाने दि.१२/०९/२०२३ तात्पुरता मनाई हुकूम देऊन कायद्याच्या प्रक्रियेचे योग्य ते पालन करून सदर इमारतीवर स्थानिक प्राधिकरण (मनपा) यांनी कार्यवाही करावी असे आदेश दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या सन १९९४ मधील सोपान मारोती थोपटे वि. पुणे महानगरपलिका या प्रकरणाच्या अनुषंगाने घालुन दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच कायद्याच्या प्रक्रियेचे योग्य ते पालन करून नियुक्त अधिकारी यांच्या मार्फत तर्कशुध्द कार्यवाही संबंधी आदेश गेल्या ८ ते ९ महीन्मा पासुन आजपावेतो देण्यात आलेले नाहीत.
यामुळे अकोला मनपा प्रशासनाच्या व्दारे सदर प्रकरणात जाणीवपुर्वक दिरंगाई करून कारवाई करण्यात विलंब करण्यात येत आहे का असे प्रश्न चिन्ह निर्माण होते. तरी अकोला मनपा प्रशासनाने या गंभीर बाबींची त्वरीत दखल घेऊन, सदर शैक्षणिक संस्थेचे अनधिकृत बांधकाम मा. न्यायालयच्या आदेशानुसार योग्य ती उचित कारवाई करून तात्काळ पाडावे अशी मागणी हरिष अश्विनी कॉलनी मधील समस्त नागरीकांनी मा. आयुक्त अकोला मनपा डॉ. सुनिल लहाने यांच्याकडे दि. २३/०६/२०२४ एका निवेदनाव्दारे केलेली आहे. सदर पत्रकार परिषदेला परिसरातील नागरीक डॉ. देवेन्द्र कोल्हे, सुहास पातुर्डे, चेतन ढोरे, निखील काठीवाले, प्रशांत देशमुख, नंदकिशोर चतरकर, डॉ. एस.टी. वानखडे, अजय कटयारमल, आशिष पाटील, डॉ. ज्ञानसागर भोकरे, श्री. विलासजी हरणे, राजेश शिंदे, संदीप पाटील, श्री. निरज लांडे, श्रीकृष्ण कटयारमल, मधुकर नारखडे, संजय अग्रवाल, निलेश निकम, शेषरावजी लांडे, सतीष नारखडे, सुशांत आमले, विनोद घनमोडे यांच्यासह असंख्य नागरीक उपस्थित होते.
0 टिप्पण्या