Ticker

6/recent/ticker-posts

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत केलेल्या घोषणेचा शासन आदेश निर्गमित करावा

मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत केलेल्या घोषणेचा शासन आदेश निर्गमित करावा

 मूर्तिजापूर 
राज्यातील मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्याबाबत केलेल्या घोषणेची आठवण ठेऊन त्याचा शासन आदेश निर्गमित करून महाराष्ट्रातल्या तमाम भगिनींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करण्याच्या मागणीसाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई चंद्रकांत दादा पाटिल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातर्फे अकोला ग्रामीण महिला जिल्हा अध्यक्ष सुषमा कावरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.


       सविस्तर बातमी येथे 👆 पहावी 

दि 9 फेब्रुवारी 2024 रोजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त, येत्या जून महिन्यापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024- 25 पासुन ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे अशा उच्च शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्रातील एकाही विद्यार्थिनीला उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी कोणतेही शैक्षणिक शुल्क भरावे लागणार नाही,अशी घोषणा केली व महाराष्ट्रातील तमाम गरजू भगिनींच्या उच्च शिक्षणाच्या आशा पल्लवीत झाल्या. उच्च शिक्षणातील अभियांत्रिकी, वैद्यकीय, विधी, अशा विविध प्रकारच्या सध्याच्या 642 आणि नव्याने सुरु होणाऱ्या 200 अभ्यासक्रमांसाठी म्हणजेच जवळपास 850 अभ्यासक्रमांसाठी ही सवलत लागू राहणार असल्याचेही आपण स्पष्ट केले होते. त्यावेळी आपण, परभणी मधील उच्च शिक्षण घेणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केली होती आणि चिठ्ठीत शिक्षणासाठी पैसे नाहीत असे लिहिले होते.आतापर्यंत राज्यात महिला भगिनींच्या हुंड्यासाठी आत्महत्या होत होत्या परंतु आता शिक्षणासाठी आत्महत्या होत आहेत, ही बाब आपल्या निदर्शनास आली. त्यामुळे संवेदनशील मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री व आपण स्वतः यांनी सर्व मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला असल्याचे
सांगितले होते. हा लाभ सर्व जात, पंथ, धर्माच्या मुलींना मिळेल अशी पुष्टीही आपण जोडली होती. या निर्णयामुळे मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढेल असा विश्वास आपण व्यक्त केला होता. परंतु, शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असुन जुन महिना अर्धा होत आलेला असुन, सर्वत्र शैक्षणिक वर्ष 2024- 25 साठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. परंतु, अद्यापही आपण घोषणा केल्याप्रमाणे विद्यार्थिनींना मोफत शिक्षणा बद्दलच्या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला नाही की अमलबजावणी करण्यात आलेली नाही.
त्यामुळे विद्यार्थीनी संभ्रमात असुन विद्यार्थिनींना प्रवेशासाठी भरमसाठ फि भरावी लागत आहे. काही ठिकाणी विद्यार्थिनी महाविद्यालय प्रशासनाला आपण केलेल्या घोषणे प्रमाणे आमची फि माफी झाल्याचे सांगत असल्याने विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासनात कटु प्रसंग निर्माण होत आहेत. कदाचीत, आपण केलेल्या लोकप्रिय घोषणेचा आपणास व शासनास विसर पडला असावा. या निमित्ताने आपणास पूनरस्मरण करून देते की, आपण केलेल्या घोषणेची आठवण ठेवुन लवकरात लवकर महाराष्ट्रातील सर्व पात्र उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींकरिता, फि माफीचा शासन निर्णय निर्गमित करून, त्याची अंमलबजावणी सुरू करावी.


आपण केलेल्या घोषणेने अडचणीत असलेल्या विद्यार्थिनींना एक आशेचा किरण निर्माण झाला होता, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही नाही. तरी, यापुढे जर फि भरण्यासाठी पैसे नसल्याने महाराष्ट्रातील एखादया विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्यास, आपण सर्वस्वी जबाबदार राहाल. नवीन शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरू होवुन जून महिना संपत आला आहे. कदाचित आपण सदर घोषणा आपल्या विस्मरणात गेली असेल म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे आपल्याला बदाम भेट म्हणून पाठवण्यात येत आहे. जेणेकरून आपण बदाम खाल्ल्यानंतर विस्मरणात गेलेल्या आपण केलेल्या मुलींना मोफत उच्चशिक्षणाच्या घोषणेची आपल्याला आठवण येईल व आपण त्यासंबंधी लवकरात लवकर शासन आदेश निर्गमित करून त्याची अंमलबजावणी सुरू कराल.
भविष्यात कोणत्याही भगिनीला फि भरण्यासाठी पैसे नसल्याने आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये हीच यामागील भूमिका. तरी आपण बदामाच्या भेटीचा स्विकार करावा व लवकरात लवकर आपण केलेल्या घोषणेचे स्मरण ठेऊन मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणेचा शासन आदेश निर्गमित करून त्याची अंमलबजावणी सुरू करावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली.


बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या