पत्रकारास जीवे मारण्याची धमकी गृहमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन
बार्शीटाकळी: निलेश इंगळे
पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्याच्या विरूध्द कारवाई करण्यासाठी गृहमंत्री यांना निवेदन सादर . सविस्तर वृत्त असे की
व्हॉइस ऑफ मीडीया चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा दै.पुण्यनगरी ता.प्र. संजय रघुनाथ पडोळे यांनी वृतपत्रांतून वृत्त प्रकाशित केल्याने ,त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कॉंग्रेस नेते प्रकाश मुरलीधर मारकवार यांच्याकडु ,भ्रमणध्वनी द्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याने ,ते व त्यांचे कुटुंबीय अत्यंत भयभीत झालेले आहे. कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी दिलेली धमकी ही वृतपत्र स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी असून पत्रकार आणि वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेणारी असल्याचे दिसून येते.यामुळे सदर नेत्याकडुन झालेल्या बेकायदेशीर कृत्याचे आम्ही व्हॉइस ऑफ मीडिया बार्शीटाकळी तालुका जाहीर निषेध नोंदवत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बार्शीटाकळी तहसीलदार राजेश वझीरे यांच्यामार्फत कठोर कारवाई करण्यासाठी निवेदन देण्यात आले . यावेळी व्हॉइस ऑफ मीडीयाचे संजय वाट ,श्याम ठक ,तारिक शेख ,विकास जाधव,बबन इंगळे ,निलेश इंगळे ,भावेश पटेल,गुफरान शेख ,कुमार काकड, मोहम्मद सुफियान ,भारत चव्हाण,श्याम कुलकर्णी,गोपाल ढोरे व संतोष हिवराळे यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या