Ticker

6/recent/ticker-posts

गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या आई-वडिलांसोबत केला सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा आपल्या आई-वडिलांसोबत केला सत्कार


गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या राष्ट्राचे नाव व परिसराचं नाव उज्वल करण्यासाठी राष्ट्र आराधनाची गरज असल्याचे सांगून शिक्षणाचा लाभ विकासासाठी लावण्यासाठी शुभेच्छा व प्रेरणा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने गेल्या 32 वर्षापासून बारावी, दहावी विद्यार्थी चा सत्कार सन्मान करण्यात येत असल्याची प्रतिपादन, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.


भाजपा कार्यालयात 404 दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजप नेते माजी महापौर विजय अग्रवाल हे होते तर मंचावर अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे किशोर पाटील, जयंत मसने, अर्चना मसने, चंदा शर्मा, सजयगोटफोडे, रमेश करिअर संतोष पांडे संदीप गावंडे निलेश निनोरे, गिरीश जोशी, आदी मंचावर विराजमान होते. स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर गोवर्धन शर्मा संजय भाऊ धोत्रे, प्रमिलाताई टोपले वसंतराव देशमुख भाऊसाहेब लहाने यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक दायित्व म्हणून वर्षापासून कार्यक्रम जनतेच्या सोबत सुखदु‌खात सोबत राहत असल्यामुळे अकोलेकर सोबत असून वीजय अगरवालयांच्या पुढाकाराने कार्यक्रम झाला. हा दिशादर्शक असल्याचे अनुप धोत्रे यांनी सांगितले. यावेळी विजय अग्रवाल किशोर पाटील जयंत मसने यांची समोरची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक गिरीश जोशी, तर संचालन एडवोकेट देवाशिष काकड आभार प्रदर्शन माधव मानकर यांनी केले.

 
बातम्यांची सुपरफास्ट मेल 🚂 राज्यात फक्त महाराष्ट्र मेल 🚂 मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या