Ticker

6/recent/ticker-posts

एल. आर. टी. महाविद्यालयातीत एन. सी. सी. कॅसेट्सनी पटकावली ट्रॉफी

एल. आर. टी. महाविद्यालयातीत एन. सी. सी. कॅसेट्सनी पटकावली ट्रॉफी


श्री. जवाहर नवोदय विद्यालय बाभुळगाव, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला यांच्या मार्फत दि २० मे ते २९ मे २०२४ पर्यंत सी.ए.टी. सी.१०२ कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्प मध्ये २८ मे २०२४ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम प्रतियोगिता आयोजीत करण्यात आली होती. या प्रतियोगितेमध्ये कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या नेतृत्वामध्ये श्रीमती एल.आर.टी. कॉलेजच्या ३८ एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेऊन महाविद्यालयाला ट्रॉफी मिळवून दिली. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रतियोगितेमध्ये ११ महाराष्ट्र बटालियनमध्ये येणाऱ्या विविध महाविद्यालय व शाळेच्या एन.सी.सी. कॅडेटनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सामूहिक नृत्य, सामूहिक अभिनय, सामूहिक गान व एकांकी नृत्य या स्पर्धा प्रकारामध्ये एल.आर.टी. महाविद्यालयाच्या युनिटने सहभाग घेऊन पहिला क्रमांक मिळवून ट्रॉफी प्राप्त केली. तसेच एकांकी नृत्य मध्ये कॅडेट उर्मिला बुंदेले हिला गोल्ड मेडल तर कॅडेट कल्याणी आमले हिल उत्कृष्ट नृत्य सादर केल्याबद्दल शिल्ड देऊन सन्मानित केले गेले. ग्रूप डान्स मध्ये कार्पोरल धनश्री चव्हाण, कॅडेट साक्षी झटाले, कॅडेट हर्षा गायकवाड, कॅडेट नितीक्षा पांडे, कॅडेट लक्ष्मी सुळे, कॅडेट धनश्री दाने, कॅडेट सारिका यादव, कॅडेट यशस्वी खंडारे, कॅडेट प्रेम अहिर, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट मंथन गोलाईत, कॅडेट सुमित मांगुळकार, कॅडेट सोकांश धवाने, कॅडेट प्रेम कळसकार, कॅडेट ओम भारती तर गुप साँग मध्ये कॅडेट सिमरन इंगळे, कॅडेट निवेदिता भोसले, कॅडेट यशवंत हरसूलकर, कॅडेट प्रवीण सोळंकी, कॅडेट अविनाश वाकोडे, कॅडेट अवेस अब्दुल, कॅडेट क्रिश करवाडिया या कॅडेटनी सहभाग घेतला होता. तसेच ॲक्ट मध्ये कॅडेट मानसी दळवी, कॅडेट प्रेरणा गोतमारे, कॅडेट निशा अरुलकार, कॅडेट आरती कोंडेकर, कॅडेट प्राची वारुडकर, कॅडेट श्रद्धा पांडे, कॅडेट तनवी मालगन, कॅडेट सानिका राजेधर, कॅडेट हर्ष देवगिरकर, कॅडेट शेख शाहिद, कॅडेट निखिल सभाधिंडे, कॅडेट पवण गिरी यांनी सुद्धा या प्रतियोगितेमध्ये आपली भूमिका बजावली होती. या संपूर्ण प्रतियोगितेचे निकाल बघून एल. आर. टी. कॉलेजला प्रथम क्रमांक देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, महाविद्यालयाचे एन.सी.सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. जी. गोंडाणे व आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल यांनी कॅडेट्सनी मिळविलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्याचा सत्कार केला. कॅडेटच्या या कामगिरीबद्दल दि. बीजीई सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजित, परांजपे, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहसचिव सीए विक्रम गोलेच्छा व समस्त कार्यकारी सदस्यांनी एन.सी.सी. कॅडेट्सचे कौतुक करून अभिनंदन केले.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या