Ticker

6/recent/ticker-posts

विनयभंगाचा आरोपी निलंबीत पी आय धनंजय सायरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर हॉटेल महाकाली संबंधित कारवाई भोवणार

विनयभंगाचा आरोपी निलंबीत पी आय धनंजय सायरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर हॉटेल महाकाली संबंधित कारवाई भोवणार


   अकोला येथील खदान पोलिस स्टेशनचा निलंबित वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय महादेव सायरे (वय ५६) याला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्याची विनंती फेटाळली असून आता त्यावर नियमित सुनावणी १३ जून रोजी ठेवण्यात आली आहे. तर वादग्रस्त महाकाली सिलेंडर व पुतण्याला डांबून ठेवल्याप्रकरणी आरोपी धनंजय महादेव सायरे, व ए पी आय निलेश करंदीकर 
यांच्या विरोधातील याचिकेवार सुनावणी १४ जूनला ठेवन्यात आली आहे.



अमरावती जिल्ह्यातील मित्राच्या २३ वर्षीय मुलीने नागपुरातील नंदनवन पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या विनयभंगाच्या  प्रकरणात आरोपी असलेला अकोला येथील 
आरोपी धनंजय सायरेची अंतरिम अटकपूर्व जामीन देण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी अमान्य करीत न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली व  सायरेच्या जामीन अर्जावर येत्या १३ जूनपर्यंत "से" ची ऑर्डर केली आहे. तर १४ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती श्रीमती वैशाली जोशी, व न्याय. विनय जोशी यांच्या न्यायालयात अकोला येथील हॉटेल महाकाली येथील गैर मार्गाने जप्त केलेले सिलेंडर व पुतण्याला गैर कायदेशीर मार्गाने डांबून ठेवल्या प्रकरणी सुनावणी होणार आहे. धनंजय सायरे अकोला येथील खदान पोलिस ठाण्यात कार्यरत असताना महाकाली येथे गैर मार्गाने हप्ता वसुलीसाठी ए पी आय निलेश करंदीकर यांच्या समवेत हॉटेल मध्ये गैरमार्गाने घुसून गॅस सिलेंडर जप्त करीत हप्ता वसुलीसाठी रघुवंशी यांच्या पुतण्याला खदान पोलीस ठाण्यात गैर कायदेशीर डांबून ठेवले होते. त्यांच्या विरोधात हॉटेल महाकाली चे संचालक हे अकोला न्यायालयात मोबाईल च्या सुपूर्दनामासाठी गेले असून याबाबत ३ जून रोजी न्याय. श्रीमती भराडे यांच्या न्यायालयात सुनावणी असून नागपूर उच्च न्यायालयात गैरमार्गाने पुतण्याला डांबून ठेवले व सिलेंडर जप्त केल्या प्रकरणी गेले आहेत. याप्रकरणी उच्च न्यायलयात सुनावणी १४ जून रोजी ठेवली आहे. अकोला न्यायलयात न्याय. श्रीमती भराडे यांच्या न्यायालयात रघुवंशी यांची बाजू ऍड. नजीब शेख हे मांडत आहेत तर नागपूर उच्च न्यायालयात ऍड.प्रकाश तिवारी, ऍड. रिचा तिवारी, ऍड. करिष्मा भोयर, ऍड. एस आर कुंभालकर हे बाजू मांडत आहेत.


महाराष्ट्र MAIL मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या