Ticker

6/recent/ticker-posts

दनोरी - पनोरी येथील मार्ग तात्काळ सुरळीत करून द्या,आ. रणधीर सावरकर यांनी घेतली दखल

दनोरी - पनोरी येथील मार्ग तात्काळ सुरळीत करून द्या,आ. रणधीर सावरकर यांनी घेतली दखल 



अधिकाऱ्यांना दिले त्वरित कारवाईचे आदेश..

अकोट तालुक्यातील दणोरी पणोरी येथील पठार नदीच्या पुलावर सद्यस्थितीत नवीन पुलाचे काम सुरू आहे. परंतु या दरम्यान पठार नदीला पूर आल्याने ग्रामस्थांना ये - जा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेला पर्यायी मार्ग हा वाहून गेला आहे. या बाबीची काल अकोला पूर्व चे आमदार रणधीर सावरकर यांना माहिती मिळताच त्यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेवून या मार्गाचे काम तात्काळ पूर्ण करून ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून दिलासा द्यावा असे आदेश दिले आहेत. आज लकवरच या मार्गावर युद्धपातळीवर कारवाई करून ही समस्या त्वरित निकाली काढू व ग्रामस्थांना योग्य सुविधा उपबद्ध करून देवू असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानिं संगितले.

ग्रामस्थांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार सावरकर यांनी नवीन पुलासाठी केला कोट्यवधीचा निधि मंजुरदरवर्षी पावसाळा सुरू झाला की पठार नदीला पूर येतो आणि दनोरी - पनोरी या गावाचा संपर्क तुटतो ही वस्तूतिस्थी आमदार सावरकर यांनी स्वतः डोळ्याने बघीतली आणि याकडे जातीने लक्ष देवून या नदीवर मोठा पुल बांधण्यासाठी शासन दरबारी सतत पाठ पुरावा करून निधि मंजुर करून आणला. या पुलाचे कामही आता अंतिम टप्प्यात आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आजची ही परिस्थिती पुलाचे काम पूर्ण झाल्यावर भविष्यात कधी निर्माण होणारं नाही एवढे मात्र खरे





बातम्यांची सुपरफास्ट मेल, फक्त आणि फक्त महाराष्ट्र मेल- मुख्य संपादक प्रा.पी.एस.थोरात मो.9822674487


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या